गूड न्यूज! दिव्यांगांसाठी नवे वर्ष ठरणार ‘हॅप्पी इअर’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2023 03:25 PM2023-12-25T15:25:34+5:302023-12-25T15:26:10+5:30

जिल्ह्यातील ३५ हजार लाभार्थी होणार फिरत्या वाहनांवरच्या दुकानांचे मालक, महिलाही घेऊन शकणार मोफत लाभ 

35 thousand disabled people of Jalgaon district now have a chance to become owners of mobile shops | गूड न्यूज! दिव्यांगांसाठी नवे वर्ष ठरणार ‘हॅप्पी इअर’...

गूड न्यूज! दिव्यांगांसाठी नवे वर्ष ठरणार ‘हॅप्पी इअर’...

कुंदन पाटील

जळगाव : स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनांवरील दुकाने उपलब्ध करून देणारी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३५ हजार दिव्यांगांना आता फिरत्या दुकानांचे मालक बनण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यातून अनेकांना स्वयंरोजगार उपलब्ध होणार आहे.

दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगारनिर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तीचे आर्थिक- सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवारासोबत जीवन जगण्यास सक्षम करणे, असा योजनेचा उद्देश आहे.  राज्यातील  दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल)मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्या करिता सदर नोंदणी पोर्टल https://evehicleform.mshfdc.co.in यावर दि.०४ जानेवारी २०२४  रोजी सकाळी १० वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

तालुकानिहाय दिव्यांग
अमळनेर-३७५३
भडगाव-१५९०
भुसावळ-२४६३
बोदवड-६५९
चाळीसगाव-१९६२
चोपडा-१९४०
धरणगाव-११८०
एरंडोल-२३५३
जळगाव-४०३५
जामनेर-४०६४
मुक्ताईनगर-१४४८
पाचोरा-२४३७
पारोळा-१४२९
रावेर-३४३७
यावल-२३०१
एकूण-३५०८७

Web Title: 35 thousand disabled people of Jalgaon district now have a chance to become owners of mobile shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.