३५० विद्यार्थ्यांनी नाकारली शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:53 PM2018-11-16T12:53:39+5:302018-11-16T12:53:57+5:30

वार्षिक उत्पन्न अधिक

350 students rejected scholarship | ३५० विद्यार्थ्यांनी नाकारली शिष्यवृत्ती

३५० विद्यार्थ्यांनी नाकारली शिष्यवृत्ती

Next

जळगाव : उच्च शिक्षण विभागाकडून दिली जाणारी शिष्यवृत्ती खुल्या संवर्गातील ३५० विद्यार्थ्यांनी विविध कारणांनी नाकारल्याचे समोर आले आहे. हे सर्व विद्यार्थी मू.जे. महाविद्यालयाचे आहेत. एकीकडे विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळावी यासाठी प्रयत्न करतात, प्रसंगी आंदोलनेही करतात, तर दुसरीकडे शिष्यवृत्ती नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे.
मू.जे. च्या या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती न घेण्याचे कारण सुध्दा महाविद्यालयाकडे अर्जाद्वारे दिले आहे़ कुणी माझ्याकडे बँकेचे खाते नाही तर कुणी माझ्याकडे दुसऱ्या राज्यातील अधिवासाचे प्रमाणपत्र आहे़ तसेच माझ्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे जादा असल्यामुळे मी शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून शकत नाही, काहींनी मला शिष्यवृत्ती नकोच असल्याचा अर्ज महाविद्यालयाकडे दिला आहे.
शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असलेले दाखले व कागपत्रे नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरलेली नाही़ यामुळे त्या विद्यार्थ्यांकडून अर्ज न भरण्याची कारणे देखील लिहून घेतलेली आहेत़ येत्या तीन महिन्यात विद्यार्थ्यांनी कागदपत्रे आणून दिल्यास त्यांच्याकडून शिष्यवृत्तीचे अर्ज भरून घेतले जातील़ -डॉ़ उदय कुळकर्णी़,
प्राचार्य़ मू़जे़ महाविद्यालय

Web Title: 350 students rejected scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.