पाचोरा शहरातील ३५००अतिक्रमित घरे नावावर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 04:25 PM2021-01-30T16:25:46+5:302021-01-30T16:27:02+5:30

सोमवारपासून ईपीएस मोजणी प्रक्रियेस सुरुवात होणार आहे.

3500 encroached houses in Pachora city will be named | पाचोरा शहरातील ३५००अतिक्रमित घरे नावावर होणार

पाचोरा शहरातील ३५००अतिक्रमित घरे नावावर होणार

googlenewsNext
ref='https://www.lokmat.com/topics/pachora/'>पाचोरा : शहरातील पालिका क्षेत्रातील अतिक्रमितधारक रहिवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली अतिक्रमित घरे रहिवाशांच्या स्वतःच्या नावावर लावण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शहरातील सुमारे ३५०० अतिक्रमित घरे नियमानुकूल होणार आहेत.आमदार किशोर पाटील व पाचोरा पालिकेच्या पुढाकाराने येत्या सोमवारपासून शहरातील विविध भागातील १८ ठिकाणी वसलेल्या नागरिकांच्या घरांच्या मोजणी प्रक्रियेला इपीएस प्रणालीद्वारे गती देण्यात येणार आहे. आमदार पाटील यांनी शुक्रवारी भूमी अभिलेख व पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या संयुक्त बैठकीत याबाबतचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या दि} १७ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार सन २०११ व त्याआधीचे अतिक्रमण नियमनाकुल करण्याचे धोरण आहे. याबाबत पाचोरा पालिकेने पुढाकार घेतला आहे. पाचोरा शहरातील बाहेरपुरा, बहिरमनगर, बंजारा वस्ती, भीमनगर, भोईवाडा, गोंडवस्ती, हनुमान नगर, जनता वसाहत, कुर्बान नगर, महात्मा फुले नगर, माहेजी नाका, मिलिंद नगर, नागसेन नगर, दसेरा मैदान (मोंढाळा रोड), रसूलनगर, श्रीरामनगर, वंजारवाडी, वरखेडी नाका भागातील सुमारे ३५०० घरे पालिकेच्या नोंदीप्रमाणे अतिक्रमित असून याच्या मोजणी प्रक्रियेला सुरुवात होत आहे. यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाच्या मदतीसाठी पालिकेचे बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मधुकर सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता हिमांशू जैस्वाल, सहाय्यक प्रकाश पवार, लास देवरे यांच्यासह कर्मचारी मदत करणार असून, त्यामुळे मोजणी प्रक्रियेस गती मिळणार आहे.भडगाव शहरातीलदेखील २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांची यादी करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. आगामी २-३ दिवसात यशवंत नगर भागासह संपूर्ण भडगाव शहरातील घरेदेखील पाचोऱ्याच्याच धर्तीवर नियमित करण्यात येणार आहे.शुक्रवार, २९ रोजी सकाळी १० वाजता आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुकुंद बिल्दीकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे यांच्यासह मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक भगवान भोये, शहर भूमापक पी.व्ही.कुलकर्णी, नगररचना विभागाच्या मानसी भदाणे यांच्यासह पालिका व भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाच्या धोरणानुसार २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांची घरे स्वतःच्या नावावर लावण्यासाठी पाचोरा पालिकेने पुढाकार घेतला असून, यासाठी मोजणी प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. यासाठी लागणारी रक्कम निश्चित करून त्यावर निर्णय घेतला जाईल. याच धर्तीवर भडगाव शहराचेदेखील अतिक्रमण नियमनाकुल केले जाईल. भडगाव शहरातील अतिक्रमणधारकांची यादी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. -किशोर पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव

Web Title: 3500 encroached houses in Pachora city will be named

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.