भडगाव तालुक्यात खरिपाच्या ३६ टक्के पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:12 AM2021-06-22T04:12:48+5:302021-06-22T04:12:48+5:30

केळी, ऊस, पपई, झेंडू यासह फळबाग लागवडही सुरू आहे. एकूण ३७ हजार ६९३ हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत एकूण १२ हजार ...

36% sowing of kharif in Bhadgaon taluka | भडगाव तालुक्यात खरिपाच्या ३६ टक्के पेरण्या

भडगाव तालुक्यात खरिपाच्या ३६ टक्के पेरण्या

Next

केळी, ऊस, पपई, झेंडू यासह फळबाग लागवडही सुरू आहे. एकूण ३७ हजार ६९३ हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत एकूण १२ हजार ७० हेक्टर क्षेत्रावर पीक पेरण्या करण्यात आल्या आहेत. बागायती कापूस पिकाची लागवड जवळपास पूर्णत्वाकडे आहे. २० रोजी तालुक्यात फक्त ५ मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत ८०.७५ मिमी पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाने केली आहे. मात्र ३ ते ४ दिवसांपासून पाऊस गायब आहे. क्वचितच काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे. पावसाअभावी बागायती कापूस लागवडीसह इतर पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

दररोज आभाळ भरून येते; परंतु पाऊस बरसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आकाशाकडे डोळे वटारल्याचे चित्र आहे. उर्वरित पीक पेरण्यांसाठी दमदार पाऊस बरसावा, अशी तालुक्यातील शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. तालुक्यात बागायती कापूस लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. कपाशी पिकाची निंदणी करताना शेतकरी, शेतमजूर रानावनात नजरेस पडत आहेत तर कुठे कपाशी पिकाची बैलजोडीने आंतरमशागत करताना शेतकरी दिसत आहेत.

सुरुवातीस लागवड केलेल्या कापूस पिकाची उगवण न झाल्याने काही प्रमाणात मर झाल्याने पुन्हा कपाशीचे बियाणे लागवड करून शेतकऱ्यांनी मर साधली आहे. काही ठिकाणी कापूस, मका लागवड होताना दिसत आहे. बागायती कपाशी पिकाची स्थिती चांगली आहे. कपाशी रोपांना हिरवी पाने लागत पिकाची वाढ होताना दिसत आहे. तालुक्यात एकूण १२ हजार ७० हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. यात बागायती कापूस ८ हजार ९०० हेक्टर, कापूस जिरायत २३०० हेक्टर, मका ५६० हेक्टर, मूग ८५ हेक्टर, उडीद ५५ हेक्टर, सोयाबीन १३० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती तालुका कृषी पर्यवेक्षक ए.पी. पाटील यांनी दिली.

===Photopath===

210621\21jal_4_21062021_12.jpg

===Caption===

भडगाव शिवारात पपई, झेंडू पिकाची निंदणी करताना .

Web Title: 36% sowing of kharif in Bhadgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.