जळगावमध्ये ३६ हजारांवर कर्मचारी संपावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 05:33 PM2023-03-14T17:33:07+5:302023-03-14T17:37:40+5:30

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटना एकत्रित आल्या.

36 thousand employees on strike in Jalgaon! | जळगावमध्ये ३६ हजारांवर कर्मचारी संपावर!

जळगावमध्ये ३६ हजारांवर कर्मचारी संपावर!

googlenewsNext

कुंदन पाटील

जळगाव : ‘एकच मिशन..जुनी पेन्शन’चा नारा देत मंगळवारपासून जिल्ह्यातील ३६ हजारांवर शिक्षक-शिक्षकेतरसह शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाले. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांसह सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटना एकत्रित आल्या. दिवसभर घोषणाबाजी करीत दुपारनंतर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन सादर करण्यात आले.जिल्ह्यातील ५६ शासकीय आस्थापनांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला.

संपात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांची विभागनिहाय संख्या कंसात : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी (२३६००), जिल्हा परिषद (८४४४),  करमणूक शाखा (५), कोषागार कार्यालय (५९), पाटबंधारे विभाग (३०७), गिरणा पाटबंधारे (१०६), सहायक उपनिबंधक (४३), जिल्हा नियोजन (४), मानव विकास समिती (२), अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र (१५),  जिल्हा कौशल्य विकास (४), सहकारी संस्था (१६), कामगार आयुक्त (७), भूमिअभिलेख (२२४), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (५०), आदिवासी विकास प्रकल्प (२५), स्थानिक निधी लेखापरिक्षक (२५), कृषी विभाग (३४२), पशुसंवर्धन विभाग (२२).

Web Title: 36 thousand employees on strike in Jalgaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव