३६२ स्वस्त धान्य दुकानदारांची अनामत रक्कम जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:44 PM2020-02-13T12:44:34+5:302020-02-13T12:45:04+5:30

जळगाव : ठरवून दिलेल्या मुदतीत शिधा पत्रिका धारकांना अन्नधान्य वाटप न करणाऱ्या जिल्ह्यातील ३६२ स्वस्त धान्य दुकानदारांची अनामत रक्कम ...

 ३६२ Deposit amount of cheap grain shopkeepers seized | ३६२ स्वस्त धान्य दुकानदारांची अनामत रक्कम जप्त

३६२ स्वस्त धान्य दुकानदारांची अनामत रक्कम जप्त

Next

जळगाव : ठरवून दिलेल्या मुदतीत शिधा पत्रिका धारकांना अन्नधान्य वाटप न करणाऱ्या जिल्ह्यातील ३६२ स्वस्त धान्य दुकानदारांची अनामत रक्कम पुरवठा विभागाने जप्त केली. यामध्ये सर्वाधिक १०१ दुकानदार जळगाव तालुक्यातील असून जिल्ह्यातील जवळपास सहा लाख रुपयांची अनामत जप्त झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या सूचनेनंतरही अन्न दिन साजरा होत नसल्याचे लक्षात आल्याने ही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यातील पुरवठा विभागाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी पुरवठा विभागाची बैठक झाली. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यासह जिल्ह्यातील गोदामपाल, पुरवठा निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक, पुरवठा अव्वल कारकून या वेळी उपस्थित होते.
अन्नदिनाला हरताळ
शासकीय धान्यापासून कोणीही वंचित राहू नये व ते वेळेत वाटप व्हावे यासाठी प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत दुकानदारांनी स्वस्त धान्याची उचल करावी व १४ तारखेपर्यंत संपूर्ण वाटप करावे, असे ठरवून देण्यात आले. त्यात ७ तारीख ही अन्नदिन म्हणून साजरा करावी, अशा सूचना होत्या. या सर्वांचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील ३६२ स्वस्त धान्य दुकानदारांनी ठरवून दिलेल्या मुदतीत धान्याचे वाटप केले नाही. त्यामुळे पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांनी या दुकानदारांची अनामत रक्कम जप्त केली.

१०१ दुकानदार जळगाव तालुक्यातील
जळगावसाठी एकेका दुकानदाराची प्रत्येकी तीन हजार रुपये तर इतर तालुक्यातील दुकानदारांची प्रत्येकी एक हजार रुपये अनामत रक्कम आहे. त्यानुसार या ३६२ दुकानदारांची अनामत रक्कम व दंडाची पावती अशी जवळपास सहा लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. ३६१ दुकानदारांपैकी सर्वाधिक १०१ दुकानदार जळगाव तालुक्यातील आहे. त्या खालोखाल भुसावळ व जामनेर तालुक्यातील दुकानदारांचा समावेश आहे.

Web Title:  ३६२ Deposit amount of cheap grain shopkeepers seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.