रेल्वेतील ३७ कर्मचारी सेवानिवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:17 AM2021-01-03T04:17:47+5:302021-01-03T04:17:47+5:30
रेल्वेस्टेशनवर स्वच्छता अभियान जळगाव : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील मित्तल शनिवारी भुसावळ दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव ...
रेल्वेस्टेशनवर स्वच्छता अभियान
जळगाव : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील मित्तल शनिवारी भुसावळ दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव रेल्वेस्टेशनवर स्वच्छता मोहीम राबवून, स्टेशन परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच स्टेशनवर ठिकठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शेगाव येथे स्वतंत्र बससेवा सुरू करण्याची मागणी
जळगाव : जळगाव आगारातून शेगाव येथे स्वतंत्र बससेवा नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरातून हजारो भाविक येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जात असतात. मात्र, बससेवा नसल्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. तरी, महामंडळाने शेगाव येथे स्वतंत्र बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्याची मागणी
जळगाव : महामंडळातर्फे टप्प्याटप्प्याने सर्व शहरातील बससेवा सुरू करण्यात येत असली तरी, ग्रामीण भागातील बससेवा अद्यापही पुरेशी सुरू झालेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तरी, महामंडळाने ग्रामीण भागातील सर्व गावांची बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
नवीन वर्षातही पॅसेंजर सुरू न झाल्याने नाराजी
जळगाव : कोरोनामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून भुसावळ विभागातून धावणाऱ्या सर्व पॅसेंजर रद्द आहेत. यामुळे प्रवासी व चाकरमान्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. तर, रेल्वेतर्फे १ जानेवारीपासून पॅसेंजर सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, अद्यापही या पॅसेंजर सुरू न झाल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
रॅम्प सुरू करण्याची मागणी
जळगाव : जळगाव रेल्वेस्टेशनवरील रॅम्पचे काम सहा महिन्यांपासून पूर्ण झाले आहे. या रॅम्पमुळे दिव्यांग व वयोवृद्ध प्रवाशांना स्टेशनमध्ये जाणे सोयीचे होणार आहे. तरी, रेल्वे प्रशासनाने तत्काळ रॅम्प सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
जिल्हा परिषदेसमोर वाहतूककोंडी
जळगाव : टाॅवर चौकाकडून जुन्या जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज सायंकाळी वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला असून, परिणामी यामुळे दररोज कोंडीची समस्या उद्भवत आहे. यावर उपाय म्हणून या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.