३७५ कर्मचाऱ्यांना मिळाला कोरोना प्रोत्साहन भत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:16 AM2021-05-23T04:16:06+5:302021-05-23T04:16:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षी कोरोना संसर्गाची लागण सुरू झाल्यानंतर, सुरुवातीच्या काळात कोरोनाचा धोका पत्करून अत्यावश्यक सेवा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षी कोरोना संसर्गाची लागण सुरू झाल्यानंतर, सुरुवातीच्या काळात कोरोनाचा धोका पत्करून अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या जळगाव विभागातील ३७५ कर्मचाऱ्यांना ३०० रुपये प्रमाणे कोरोना प्रोत्साहन भत्ता देण्यात आला आहे. यात यांत्रिकी व वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात पर राज्यात जाणाऱ्या कामगारांना सीमेवर पोहचविण्याचे काम एसटी महामंडळाच्या चालकांनी केले. यावेळी कोरोना संसर्गाचा धोका पत्करून कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना ३०० रुपये अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर केले होते.गेल्या वर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मुंबई येथील परप्रांतीय बांधव रस्त्याने पायी पर राज्यात जात होते. यावेळी राज्य शासनाने या परप्रांतीय बांधवांना महामंडळाच्या बसेसद्वारे त्या-त्या भागातील परप्रांतीयांना त्यांच्या राज्याच्या बसने सीमेवर सोडण्यात येते. मात्र, कोरोनाच्या या भीषण परिस्थितीत महामंडळाने जे कर्मचारी अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी कामावर येतील, त्यांना पगारा व्यक्तीरिक्त अतिरिक्त ३०० रुपये भत्ता देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जळगाव विभागातील प्रत्येक आगारातून मोठ्या संख्येने चालकांनी, यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांनी व
वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांनी ही सेवा बजावली. एकूण जळगाव विभागातील ३७५ कर्मचाऱ्यांनी ही सेवा बजावली. त्यांना नुकताच महामंडळातर्फे प्रोत्साहन भत्ता देण्यात आला आहे.
इन्फो :
कोरोना प्रोत्साहन भत्ता मिळालेले
१) चालक : २२७
२) वाहतुक कर्मचारी : १३७
३) यांत्रिकी कर्मचारी : ११
एकूण वाटप : १ लाख १२ हजार ५०० रुपये
इन्फो :
गेल्या वर्षी कोरोना काळात ज्या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली, त्या कर्मचाऱ्यांना महामंडळातर्फे ३०० रुपये कोरोना प्रोत्साहन भत्ता देण्यात आला आहे. ज्यांनी सेवा बजावली नाही, त्यांना लाभ देण्यात येणार नाही.
भगवान जगनोर, विभाग नियंत्रक