‘अमृत’ साठी 380 कोटींचा प्रस्ताव सादर
By admin | Published: September 16, 2015 11:47 PM2015-09-16T23:47:41+5:302015-09-16T23:47:41+5:30
अमृत योजनेसाठी झालेल्या कार्यशाळेत महापालिकेचा 682 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला़ केंद्रीय समितीने पहिल्या टप्प्यात 380 कोटी रूपयांच्या कामांना मंजूरी दिली.
धुळे : अमृत योजनेसाठी मुंबईत झालेल्या कार्यशाळेत बुधवारी महापालिकेचा 682 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला़ केंद्रीय समितीने पहिल्या टप्प्यात 380 कोटी रूपयांच्या कामांना मंजूरी दिल्याची माहिती आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी दिली़ महापालिकेने 682 कोटी रूपयांचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत शासनाला सादर केला होता़ हा प्रस्ताव बुधवारी केंद्रीय समितीला सादर करण्यात आला़ प्रस्तावात समितीने काही किरकोळ त्रुटी काढल्या, पण या त्रुटींची तत्काळ पूर्तता करण्यात आली़ समितीने पहिल्या टप्प्यात 380 कोटी रूपयांच्या कामांना मंजूरी दिली आह़े त्यात भुयारी गटारी योजनेसाठी 238 कोटी, व अक्कलपाडा प्रकल्प ते हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्रार्पयत जलवाहिनी टाकणे व हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता 25 एमएलडीने वाढविणे या कामांसाठी 142 कोटी असा 380 कोटी रूपयांच्या प्रस्ताव समितीने स्विकारला़ आता अंतिम मंजूरीसाठी हा प्रस्ताव शासनाला सादर करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितल़े महापालिकेने या योजनेत सर्व प्रलंबित योजना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला होता़ पण अन्य योजनांना दुस:या टप्प्यात प्राधान्य देणार असल्याचे केंद्रीय समितीने स्पष्ट केल़े अक्कलपाडा ते हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्राच्या प्रस्तावासह भुयारी गटारी योजनेचा प्रलंबित अखेर प्रस्ताव मार्गी लागणार आह़े या दोन्ही प्रस्तावांसाठी मनपाने वेळोवेळी पाठपुरावा केला होता़ यावेळी अभियंता कैलास शिंदे, ओव्हरसिअर पी़डी़चव्हाण उपस्थित होत़े