३८ हजार शेतकऱ्यांनी केला बिलाचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:16 AM2021-03-19T04:16:28+5:302021-03-19T04:16:28+5:30

महावितरण :कृषिपंपांच्या ९९३ वीजजोडण्या कार्यान्वित जळगाव : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरणाची अंमलबजावणी जळगाव परिमंडलात गतीने सुरू आहे. यात ...

38,000 farmers paid their bills | ३८ हजार शेतकऱ्यांनी केला बिलाचा भरणा

३८ हजार शेतकऱ्यांनी केला बिलाचा भरणा

Next

महावितरण :कृषिपंपांच्या ९९३ वीजजोडण्या कार्यान्वित

जळगाव : राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरणाची अंमलबजावणी जळगाव परिमंडलात गतीने सुरू आहे. यात वीजबिलातील भरघोस सवलतीचा लाभ घेत खान्देशातील तिन्ही जिल्ह्यात ३८ हजार १७२ शेतकऱ्यांनी ३७ कोटींचा बिल भरणा केला आहे.

तसेच धोरणांतर्गत कृषिपंपांच्या ९९३ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या कृषिपंपांना जवळच्या रोहित्रावर पुरेशी क्षमता असल्यास नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासोबतच ज्या कृषिपंपांद्वारे अनधिकृत वीजवापर सुरू आहे, त्यांनाही नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी रोहित्रांवर क्षमता उपलब्ध नाही, त्या रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात येणार आहे. लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत अंतर असलेल्या जळगाव जिल्ह्यात ५३१, धुळे जिल्ह्यात २४२ आणि नंदुरबार जिल्ह्यात १६७ वीज जोडण्या अशा एकूण ९४० जोडण्या जळगाव परिमंडलात देण्यात आल्या आहेत.

ऑक्टोबर २०२० मध्ये सुरू झालेल्या या योजनेत थकबाकी भरण्यासाठी भरघोस सवलत देण्यात आलेली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात १४ हजार ५९१ शेतकऱ्यांनी १८ कोटी ८ लाख, धुळे जिल्ह्यात १५ हजार ७२१ ग्राहकांनी ९ कोटी ४२ लाख, तर नंदुरबार जिल्ह्यातील ७ हजार ८६० ग्राहकांनी ९ कोटी ८३ लाख रुपये असे जळगाव परिमंडळातील एकूण ३८ हजार १७२ शेतकऱ्यांनी कृषिपंपांच्या वीजबिलापोटी ३७ कोटी ३३ लाख रुपये भरणा करून या योजनेचा लाभ घेतला आहे.

Web Title: 38,000 farmers paid their bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.