जळगाव जिल्ह्यात दुषीत पाण्याचा ३९ जणांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 08:22 PM2019-06-08T20:22:24+5:302019-06-08T20:26:19+5:30

यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे दुषीत पाण्यामुळे ३९ जणांना बाधा झाली असून उलट्या व जुलाबचा त्रास होऊ लागल्याने या सर्व जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसापासून हा त्रास सुरु होता,मात्र शनिवारी एकाच वेळी अनेकांना उलट्या झाल्याने गावात एकच खळबळ उडाली.

39 people affected by impaired water in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात दुषीत पाण्याचा ३९ जणांना बाधा

जळगाव जिल्ह्यात दुषीत पाण्याचा ३९ जणांना बाधा

Next
ठळक मुद्देकोळन्हावी येथील घटनाजिल्हा रुग्णालयात उपचार सुरुगटारीचे पाणी मिश्रण झाल्याचा संशय

जळगाव : यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे दुषीत पाण्यामुळे ३९ जणांना बाधा झाली असून उलट्या व जुलाबचा त्रास होऊ लागल्याने या सर्व जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसापासून हा त्रास सुरु होता,मात्र शनिवारी एकाच वेळी अनेकांना उलट्या झाल्याने गावात एकच खळबळ उडाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात सामुदायिक विहिर व हातपंपाचे पाणी पुरविले जाते. बोअरींगच्या पाण्यामुळे त्रास झाल्याचे काही जणांचे म्हणणे आहे, पाईप लाईनला गळती झाल्यामुळे गटारीच्या पाण्याचे मिश्रण झाल्याने तेच पाणी पिण्यासाठी वापरले गेले, त्यामुळे हा त्रास झाल्याचे काही रुग्ण सांगत होते. तीन दिवसापासून दुषीत पाणी पुरवठा होत असल्याने काही जणांना पोटदुखीचा देखील त्रास झाला. जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यांच्यावर सुरु आहेत उपचार
निलेश इंगळे (२२), सुंदरबाई कोळी (६५), प्रकाश कोळी (३२), नाना कोळी (३५), ज्ञानेश्वर कोळी (३८), आशाबाई सोनवणे (२२), श्रीकृष्ण तायडे (४४), नंदीनी साळुंखे (२४), देविदास सोनवणे (३२), बळीराम निकम (३२), भारती साळुंखे (२८), पल्लवी साळुंखे (२२), जनार्दन साळुंखे (५५), शिला साळुंखे (३०), धीरज साळुंखे (१०), सुनीता साळुंखे (३४), प्रदीप साळुंखे (२३), कल्पना साळुंखे (४०), सुषमा साळुंखे (१७),ललीता साळुंखे (२८), नीशा साळुंखे (१९), गोपाळ साळुखें (२२), नलुबाई साळुंखे (४०), ललिता तायडे (६०), शोभा साळुंखे (४५), मिराबाई कोळी (६०), मनुबाई साळुंखे (५५), जिजाबाई साळुंखे (४५), भागवत साळुंखे (६५), अनुसया साळुंखे (४५), प्रकाश इंगळे (५५), ललीत साळुंखे (३०) व प्रदीप साळुंखे (३२) आदी.

Web Title: 39 people affected by impaired water in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.