जळगाव जिल्ह्यातील डोलारखेडा वनक्षेत्रात ३९ गावठी बॉम्ब नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 10:50 PM2018-03-12T22:50:27+5:302018-03-12T22:50:27+5:30
धोकेदायक वन्य प्राण्यांसाठी वढोदा वन क्षेत्रात पेरण्यात आलेले ३९ गावठी बॉम्ब सोमवारी न्यायालयाच्या आदेशाने डोलारखेडा ता.मुक्ताईनगर वनक्षेत्रात नष्ट करण्यात आले. वनअधिकारी, पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने विशिष्ट कार्यप्रणालीनुसार हे बॉम्ब नष्ट केले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१२ : धोकेदायक वन्य प्राण्यांसाठी वढोदा वन क्षेत्रात पेरण्यात आलेले ३९ गावठी बॉम्ब सोमवारी न्यायालयाच्या आदेशाने डोलारखेडा ता.मुक्ताईनगर वनक्षेत्रात नष्ट करण्यात आले. वनअधिकारी, पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने विशिष्ट कार्यप्रणालीनुसार हे बॉम्ब नष्ट केले. शिकारीच्या वेळी वन्य प्राण्यांना गावठी बॉम्ब खाण्याचा मोह व्हावा यासाठी या बॉम्बला वरच्या भागात चरबी लावली जाते. हा बॉम्ब खाताच वन्य प्राण्यांच्या शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे होऊन प्राणी दगावले जातात. वन विभागाने हे ३९ बॉम्ब जप्त केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होता. न्यायालयाने हे बॉम्ब नष्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे प्रमुख ईश्वर सोनवणे, प्रदीप बडगुजर, जुबेर शेख, रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, अजहर मिर्झा व विजय भोंबे यांनी डोलारखेडा, ता.मुक्ताईनगर वनक्षेत्रात नष्ट केले. यातील चार बॉम्बचे अवशेष काढण्यात आले असून ते तज्ज्ञांना पाठविण्यात येणार आहे.