१२१ इलेक्ट्रिक बसेससाठी ४ चार्जिंग सेंटर! ऑगस्टमध्ये येणार सेवेत; १० साध्या गाड्याही होणार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 05:34 PM2023-04-25T17:34:43+5:302023-04-25T17:39:35+5:30

नव्याने बांधण्यात आलेल्या १० साध्या बसेस या आठवड्यात येणार आहेत. त्यामुळे ऐन सुटीच्या कालावधीत प्रवाशांची सोय होणार आहे.

4 charging centers for 121 electric buses Coming into service in August; 10 simple buses will also enter | १२१ इलेक्ट्रिक बसेससाठी ४ चार्जिंग सेंटर! ऑगस्टमध्ये येणार सेवेत; १० साध्या गाड्याही होणार दाखल

१२१ इलेक्ट्रिक बसेससाठी ४ चार्जिंग सेंटर! ऑगस्टमध्ये येणार सेवेत; १० साध्या गाड्याही होणार दाखल

googlenewsNext

कुंदन पाटील -

जळगाव : जिल्ह्यातील बस आगारांसाठी १२१ इलेक्ट्रिक बसेस ऑगस्टमध्ये दाखल होणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात चारठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. दरम्यान, नव्याने बांधण्यात आलेल्या १० साध्या बसेस या आठवड्यात येणार आहेत. त्यामुळे ऐन सुटीच्या कालावधीत प्रवाशांची सोय होणार आहे.

या आर्थिक वर्षात १५० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट उलेक्ट्रो आणि विनसेल या कंपन्यांना दिले आहे. तर ५१५० इलेक्ट्रिक बसेससाठी एसटीने निविदा काढली होती.त्यानुसार १२ एप्रिलपर्यंत निविदेची प्रक्रिया निकाली निघाली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बसेस ऑगस्टमध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार जळगावच्या वाट्याला १२१ बसेस येणार आहेत.

चारठिकाणी चार्जिंग सेंटर
जिल्ह्यात चारठिकाणी चार्जिंग सेंटर उभारण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. जळगाव, चोपडा, पाचोरा व भुसावळ याठिकाणी बसेससाठी चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

१० साध्या बसेस येणार
दरम्यान, डिझेलवर चालणाऱ्या आणि नव्याने बांधण्यात आलेल्या १० बसेस जळगाव विभागाला मिळणार आहेत.  सुट्या, सणावळी आणि लग्नसराईच्या काळात या बसेस येणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.ञ

किती किलोमीटर धावते?
इलेक्ट्रिक बस सुरू झाल्यानंतर इंधनावरील खर्चात बचत होणार आहे. त्यामुळे शहराचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. ३०० केडब्ल्यूएच बॅटरी क्षमतेची १२-मीटर बस चांगल्या हवामानाच्या दिवसांमध्ये तब्बल 375 किमी कव्हर करू शकते. परंतु हिवाळ्याच्या दिवशी, मायलेज १२० ते १३० किमीदरम्यान कमी देते. डिझेल हीटिंग २०० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी पूरक ठरते. ञ

इलेक्ट्रिक बसेससाठी चार्जिंग स्यंटर उभारणीचे काम सुरु झाले आहे. या सेंटरवरची सेवा कार्यान्वीत होताच इलेक्ट्रिक बसेस येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
-भगवान जगनोर, विभाग नियंत्रक
 

Web Title: 4 charging centers for 121 electric buses Coming into service in August; 10 simple buses will also enter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव