४ दिवसात खड्डे बजुले नाही तर खड्ड्यात टाकणार : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 05:52 PM2018-08-30T17:52:34+5:302018-08-30T17:57:48+5:30

जळगाव तालुक्यातील असोदा - शेळगाव रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यावरील खड्डे ४ दिवसात बुजले नाही तर तुम्हाला खड्ड्यात टाकीन, असा दम सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिका-यांना भरला.

in 4 days will not be able to dig the pits...: Minister Gulabrao Patil | ४ दिवसात खड्डे बजुले नाही तर खड्ड्यात टाकणार : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील

४ दिवसात खड्डे बजुले नाही तर खड्ड्यात टाकणार : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील

Next
ठळक मुद्देआढावा बैठकीत भरला अधिकाऱ्यांना दमअधिका-यांकडून होते पैशांची मागणीजळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचा घेतला आढावा

जळगाव : जळगाव तालुक्यातील असोदा - शेळगाव रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यावरील खड्डे ४ दिवसात बुजले नाही तर तुम्हाला खड्ड्यात टाकीन, असा दम सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिका-यांना भरला.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कामांचा आढावा गुरुवारी त्यांनी जळगाव पंचायत समितीत घेतला. यावेळी ते बोलत होते.
रस्त्यांची झालेली दुरवस्था, किरकोळ कारणांमुळे नामंजूर करण्यात येत असलेली शासकीय योजनांची गोरगरीबांची प्रकरणे, दाखल्यांसाठी सर्वसामान्यांची होणारी दमछाक आणि कामांची बिले मंजूर करण्यासाठी अधिकाºयांकडून पैशांची मागणी या मुद्यांवरुन गुलाबराव पाटील यांनी उपस्थित अधिकाºयांचे कान उपटले.

Web Title: in 4 days will not be able to dig the pits...: Minister Gulabrao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.