भडगाव तालुक्यातील ४ ग्रा. पं.च्या प्रत्येकी एका जागेसाठी अर्जच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 09:24 PM2019-06-06T21:24:08+5:302019-06-06T21:25:44+5:30

८ ठिकाणच्या पोटनिवडणुका : बोरनार सरपंचासाठीही उमेदवारी नाही

4 grams of Bhadgaon taluka There is no applying for each of the seats of Pt. 8 by bye-elections: There is no candidate for Boranar Sarpanch | भडगाव तालुक्यातील ४ ग्रा. पं.च्या प्रत्येकी एका जागेसाठी अर्जच नाही

भडगाव तालुक्यातील ४ ग्रा. पं.च्या प्रत्येकी एका जागेसाठी अर्जच नाही

Next

भडगाव तालुक्यातील ४ ग्रा. पं.च्या प्रत्येकी एका जागेसाठी अर्जच नाही

भडगाव : तालुक्यात एकुण ८ ग्रामपंचायतीच्या एकुण ८ रिक्त जागंसाठी पोटनिवडणूक२३ होत आहे. तर बोरनार ग्रामपंचायतीची पंचवार्षीक सार्वत्रिक निवडणूक एकुण ७ जागांसाठी याच दिवशी होत आहे. दरम्यान ६ रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भट्टगाव, वडगाव बुद्रुक, गोंडगाव, भातखंडे या चार ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी १ जागेसाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने या जागा रिक्तच राहणार आहेत.
या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ६ रोजी शेवटचा दिवस होता. या दिवशी बोरनार लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही. तर एकुण ७ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक असतांना फक्त १ अर्ज प्रभाग नं. ३ मध्ये दाखल करण्यात आला. त्यामुळे ही १ जागा बिनविरोध होण्यात जमा आहे. तर बोरनार येथे सरपंचपद व एकुण ६ सदस्यांच्या जागा रिक्तच राहणर आहेत.
तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींच्या एकुण ८ जागांपैकी पिचर्डे ग्रामपंचायतीची प्रभाग नं. २ साठी १ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे ही जागा बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. वलवाडी व घुसर्डी खुर्द येथेही एका जागेसाठी एकच अर्ज दाखल झाला. अंतुर्ली ग्रामपंचायतीच्या १ जागेसाठी २ उमेदवारी अर्ज झाले आहेत.
७ रोजी छाननी होणार असून माघारीची अंमीम मुदत १० रोजी दुपारी ३ पर्यंत आहे. मतमोजणी २४ रोजी होणार आहे.
दरम्यान रिक्त पैकी बहुतांश जागा या राखीव असून कागदपत्रांअभावी अर्ज दाखल होत नसल्याचे जाणकारांकडून समजते.

Web Title: 4 grams of Bhadgaon taluka There is no applying for each of the seats of Pt. 8 by bye-elections: There is no candidate for Boranar Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.