सुरत महामार्गावरील अपघातात 4 ठार, 10 जखमी
By admin | Published: March 26, 2017 02:46 PM2017-03-26T14:46:36+5:302017-03-26T14:46:36+5:30
ट्रक व सुमोची समोरा- समोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात सुमोमधील 3 जण जागीच ठार व एकीचा उपचादरम्यान मृत्यू झाल़ा तर 10 जण जखमी झाले आह़े
Next
मुकटी जवळ ट्रक- सुमोची धडक : रास्तारोकोमुळे वाहतुक ठप्प
धुळे, दि.26- नागपूर- सुरत महामार्गावरील मुकटी शिवारात ट्रक व सुमोची समोरा- समोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात सुमोमधील 3 जण जागीच ठार व एकीचा उपचादरम्यान मृत्यू झाल़ा तर 10 जण जखमी झाले आह़े तिघांमध्ये दोन बालकांचा समोवश आह़े ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़ जखमींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आह़े दरम्यान महामार्गावरील खड्डे बुजवावे, यासह अन्य मागण्यासाठी ग्रामस्थांनी दीड ते दोन तास रास्ता रोको आंदोलन केल़े त्यामुळे वाहतूक ठप्त झाली होती़ आश्वासनंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतल़े
फरजाना ईसाक (30 रा़ ओसाडा आवाज, गणेपुर, सुरत, गुजरात), सुमय्या इब्राहीम मकवा (7), सिध्दी ईसाक मकवा (4) हे तिघे जागीच ठार झाले. तर शहाजा सिध्दी मकवा (23) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ जखमींमध्ये फरीदाबी अली मोहंमद (वय 46), फरजना इब्राहीम मकवा (वय 30), ईसाद सालम मकवा (वय 55), सिध्दी अनस ईसाक मकवा (वय 2), सिध्दी ईसाक अत्तर हुसैन मकवा (वय 29), सिध्दी उजेस ईस्माईल मकवा (वय 17), सिध्दी फरसाना ईब्राहीम मकवा (वय 26), इब्राहीम युसुफ मकवा (वय 34) सिदीक चाँद (वय28), मोहंम्मद जसद सिदीक (वय 3) सर्व (रा़ वरी गल्ली बाजार, दास्तीपुर, खान साहेब बाढा, सुरत, गुजरात) यांचा समावेश आह़े त्यातही दोन जण गंभीर आहेत़
सर्व प्रवासी 26 मार्च रोजी पहाटे सुमो वाहनाने (जी़जे 7 आर 6980) सुरतहुन पारोळा येथे नातेवाईकांकडे साखरपुडय़ासाठी निघाले होत़े सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मुकटी शिवारात सुमोची व समोरून येणा:या भरधाव ट्रकची (एमएच 4 एफ़पी 0556) जोददार धडक झाली़ त्यामुळे सुमोवाहनाचा वरील संपुर्ण भाग कापला गेला व वाहन रस्त्याच्या कडेला उतरल़े तसेच धडकेनंतर ट्रकही रस्त्याच्या कडेचे झाड तोडून खाली उतरले होत़े जखमींना सकाळी नऊ वाजता आयशर वाहनाने (एमएच 18 एए 7653) हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केल़े
रास्ता रोको, दोन तास वाहतूक ठप्त
अपघातानंतर महामार्गावरील खड्डे बुजवावे यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आल़े त्यामुळे वाहतूक ठप्त झाली होती़ वाहनांच्या रांगा लागल्या होता़ पोलिसांसह राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका:यांनी ग्रामस्थांची समजुत काढली़ तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली़ अखेर महामार्ग प्राधीकरणच्या अधिका:यांनी दोन तासात खड्डे बुजवविण्याचे आश्वासन दिल़े त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल़े