विज पडून मयत झालेल्या विद्याथ्र्याच्या वारसांना 4 लाखांची मदत

By Admin | Published: June 2, 2017 05:30 PM2017-06-02T17:30:54+5:302017-06-02T17:30:54+5:30

वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या गणेश इंगळे या मयत विद्याथ्र्याच्या वारसांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते 4 लाखांचा धनादेश देण्यात आला.

4 lakhs help to the heirs of the deceased student | विज पडून मयत झालेल्या विद्याथ्र्याच्या वारसांना 4 लाखांची मदत

विज पडून मयत झालेल्या विद्याथ्र्याच्या वारसांना 4 लाखांची मदत

googlenewsNext

 ऑनलाईन लोकमत

तोंडापूर ता.जामनेर, दि.2- काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसा दरम्यान वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या गणेश इंगळे या मयत विद्याथ्र्याच्या वारसांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते 4 लाखांचा धनादेश देण्यात आला.
काही दिवसापूर्वी विजेच्या कडाक्यासह पावसाने जामनेर तालुक्यात जोरदार हजेरी लावली होती. यात बक:या चारण्यासाठी गेलेला गणेश इंगळे याच्या अंगावर विज कोसळून तो जागीच ठार झाला होता. या घटनेचा जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ पंचनामा करण्यात येऊन अहवाल सादर करण्यात आला. मयताच्या वारसांना शासनाच्या नैसर्गीक आपत्ती निधीतून चार लाख रुपयांचा निधी मंजुर करून जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.
मयत विद्याथ्र्याच्या आईवडिलांनी हा धनादेश स्विकारला. यावेळी  तहसीलदार टिळेकर, जगन्नाथ चव्हाण,  तलाठी भिक्कड, पोलीस निरीक्षक गायकवाड उपस्थित होते.

Web Title: 4 lakhs help to the heirs of the deceased student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.