४ महिला कोठडीत, २७ सुधारगृहात, चोपडा येथील कुंटनखाना प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:25 PM2019-06-28T22:25:46+5:302019-06-28T22:28:05+5:30
चोपडा : शहराबाहेरील धरणगाव रस्त्यावर असलेल्या कुंटनखान्यावर सहायक पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या पथकाने गुरुवारी धाड टाकली. या प्रकरणात ...
चोपडा : शहराबाहेरील धरणगाव रस्त्यावर असलेल्या कुंटनखान्यावर सहायक पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या पथकाने गुरुवारी धाड टाकली. या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या ३२ पैकी ४ महिलांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून १ महिला आरोपी फरार आहे.
या प्रकरणातील २७ महिलांची जळगाव येथील महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच अटकेत असलेल्या १६ आंबट शौकिनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. चोपडा - धरणगाव रस्त्यावरील पाटचारी लगत मोठया प्रमाणात सुरू असलेल्या कुंटनखान्यावर २७ जून रोजी चोपडा पोलिसांनी धाड टाकून यात १६ पुरुष व ३२ महिलांना अटक केली. यात मोबाईल, दुचाकी व आॅटो रिक्षा जप्त करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी अटकेत असलेल्या ४ महिलांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. २७ महिलांची जळगाव येथील आशादीप महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली. या कुंटनखान्यात सापडलेल्या १६ पुरुषांवर मुंबई पोलीस कायदा कलम ११०, ११७ प्रमाणे करण्यात कारवाई आली. पुढील तपास सहायक पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल करीत आहे.