जळगाव जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरणात ४० टक्के लाभार्थी शाळाबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:49 PM2018-11-29T12:49:22+5:302018-11-29T12:51:12+5:30

८ लाख ५८ हजार लाभार्थ्यांना देणार गोवर व रुबेला लस

40% beneficiaries of GOVER-RUBLA vaccination in Jalgaon district out of school | जळगाव जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरणात ४० टक्के लाभार्थी शाळाबाह्य

जळगाव जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरणात ४० टक्के लाभार्थी शाळाबाह्य

Next
ठळक मुद्देपालकांच्या संमतीपत्राची आवश्यकता नाही पाच आठवड्यात लसीकरण करण्यात येणार

जळगाव : मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेचे जिल्ह्यात ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ८ लाख ५७ हजार ८४८ लाभार्थी असून त्यांना पाच आठवड्यात लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील या लाभार्थींप्ांैकी ६४ ते ६४ टक्के लाभार्थी हे शालेय विद्यार्थी असून त्यांना शाळेतच लसीकरण केले जाणार आहे. तसेच उर्वरित ३५ ते ४० टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण अंगणवाडी केंद्र व बाहय लसीकरण सत्रात केले जाणार आहे. या लसीकरणासाठी पालकांच्या समंतीपत्राची आवश्यकता नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अत्यंत संक्रमक व घातक असलेल्या गोवर आजाराचे तसेच त्या मानाने सौम्य संक्रमक आणि मुलांना तसेच प्रौढ व्यक्तींनादेखील होणा-या रुबेला या आजारांचे निर्मूलन करण्यासाठी जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थींचा आढावा घेतला असता या लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ८ लाख ५७ हजार ८४८ लाभार्थी आहेत.या सर्व लाभार्थ्यांना ५ आठवड्यात लसीकरण करण्यात येणार आहे.
एकूण लाभार्थ्यांपैकी ६० ते ६५ टक्के लाभार्थी हे शाळेत जाणारे आहेत. त्यांना लस देण्यासाठी ३ हजार ३८० शाळांमध्ये एकूण ४३६६ लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहे. उर्वरित ३५ ते ४० टक्के लाभार्थी शाळाबाह्य असून नंतरच्या २ आठवडयात अंगणवाडी केंद्र व बाह्य लसीकरणाचे ३०३३ सत्र, दुर्गम अति जोखमीचा भागामध्ये एकूण १३५ सत्र व २४८३ संस्थेतील सत्र असे एकूण जिल्ह्यातील १० हजार १७ सत्रामध्ये गोवर रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे.
संमतीपत्राची आवश्यकता नाही
राज्यात काही ठिकाणी या लसीकरण मोहिमेसाठी पालकांकडून संमतीपत्र मागितले जात असल्याच्या तक्रारी होत्या. या बाबत शहरातीलही आढावा घेतला असता शाळांकडून संमतीपत्र मागितले नसल्याचे सांगण्यात आले. तसेच यासाठी संमतीपत्राची आवश्यकता नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा लाभ सर्व नागरिकांनी घेऊन आपल्या ९ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या सर्व मुला व मुलींना गोवर रुबेलाची लस द्यावी. ही लस पूर्णत: मोफत राहणार आहे. यासाठी पालकांच्या संमतीपत्राची आवश्यकता नाही.
डॉ. बबिता कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

गोवर रुबेला लसीकरणासाठी पालकांची बैठक घेऊन त्यांना माहिती देण्यात आली आहे. मात्र संमतीपत्र आवश्यक नाही.
- रेखा पाटील, मुख्याध्यापिका, गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील विद्यामंदिर

Web Title: 40% beneficiaries of GOVER-RUBLA vaccination in Jalgaon district out of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.