४० विवाह निश्चित, चार घटस्फोटीतांचा फुलणार संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:10 PM2019-12-02T12:10:17+5:302019-12-02T12:10:55+5:30

लेवा समाज मेळावा : विदेशातूनही समाज बांधवांची उपस्थितीत ५७० युवक-युवतींचा परिचय

४० Marriage is a fixed, full blown world of four divorces | ४० विवाह निश्चित, चार घटस्फोटीतांचा फुलणार संसार

४० विवाह निश्चित, चार घटस्फोटीतांचा फुलणार संसार

googlenewsNext

जळगाव : लेवा समाजाच्यावतीने रविवारी आयोजित परिचय मेळाव्यात ४० युवक-युवतींच्या विवाहाबाबत सकारात्मक बोलणी झाली तर चार घटस्फोटीत युवतींचे विवाह जुळले़ ५७० युवक-युवतींनी परिचय दिला़ देशातूनच नव्हे परदेशातूनही युवक-युवती व त्यांचे पालक या मेळाव्यासाठी आले होते़ सकाळी दहा ते सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत मेळावा सुरू होता़ साडे चार ते पाच हजार समाजबांधवांची यावेळी उपस्थिती होती़
लेवा नवयुक संघातर्फे एकलव्य क्रीडा संकुलाच्या भव्य मैदानावर या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़
व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा़ पी़ पी़ पाटील, भोरगाव लेवा पंचायतचे कुटुंब नायक रमेश पाटील, महापौर सीमा भोळे, सरकारी वकील केतन ढाके, केसीई सोसायटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश पाटील, डॉ़ अर्जुन भंगाळे, विक्रीकर विभागाचे सहआयुक्त बी़ एऩ पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, नगरसेविका गायत्री राणे, अनिल नारखेडे, उद्योजक सुनील बढे, लेवा नवयुक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी, अनिल चौधरी,कीर्ती चौधरी, नितीन चौधरी आदींसह मान्यवर उपस्थित होते़ सुत्रसंचालन प्रणिता झांबरे व नितीन नेमाडे यांनी केले़
युवकांना स्वयंपाकाची आवड असल्यास प्राधान्य़़़
एकत्रित कुटुंबात राहणाऱ्या युवतीला प्राधान्य, अनुरूप, नोकरीस प्राधान्य अशा अपेक्षा युवकांनी व्यक्त केल्या तर युवकांप्रती ते अनुरूप, सुशिक्षित शिवाय स्वयंपाकाची आवड असल्यास प्राधान्य अशा काही अपेक्षा युवतींनी यावेळी व्यक्त केल्या़ सध्या लग्न जमविणे अवघड झाले आहे कारण एकमेकांप्रती अपेक्षा वाढल्या असून त्यात तडजोडी होत नसल्याने विवाह जमविणे अवघड असल्याचे या ठिकाणी एक बॅनरही लावले होते़
...तर समाज व्यवस्था कोलमडेल
लेवा समाज हा सर्वत्र विखुरलेला समाज आहे़ मात्र, समाजात मुलांच्या तुलनेत मुलींची घटती संख्या ही चिंताजनक असून ही संख्या घटत राहिल्यास समाज व्यवस्था कोलमडेल, त्यामुळे मुलींची संख्या वाढणे गरजेचे असल्याचे मत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले़ परिचय मेळावे हे गावागावापर्यंत पोहचणे गरजेचे आहे़ एकत्रीत कुटुंबात राहायला नकार दिला जातो, त्यामुळे कळत -नकळत आपण कुटुंब व्यवस्थेवर आघात करीत असल्याचे ते म्हणाले.

आॅनालाईन परिचय
मेळाव्यासाठी अमेरिका, ब्राझील, दुबई, आॅस्ट्रेलिया या देशातील युवक-युवतीही आलेले होते़ यासह परदेशातील वीस ते पंचवीस युवक-युवतींनी या मेळाव्यात स्क्रीनवर आॅनलाईन परिचय करून दिला़ मंडपात दोन ठिकाणी मोठ्या स्क्रीन लावण्यात आलेल्या होत्या़ अतिशय शिस्तीत हा मेळावा पार पडला़ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन पुस्तक प्रकाशन करण्यात आले़

Web Title: ४० Marriage is a fixed, full blown world of four divorces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.