शिवसेनेतून 40 आमदार फुटले, पण फक्त मला टार्गेट केलं जात आहे; गुलाबराव पाटलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 09:13 PM2022-11-06T21:13:33+5:302022-11-06T21:13:43+5:30

'खापर पंजोबा खाली येऊ दे, आडवा केल्याशिवाय राहणार नाही.'

40 MLAs split from Shiv Sena, but only I am being targeted; Gulabrao Patal's allegation | शिवसेनेतून 40 आमदार फुटले, पण फक्त मला टार्गेट केलं जात आहे; गुलाबराव पाटलांचा आरोप

शिवसेनेतून 40 आमदार फुटले, पण फक्त मला टार्गेट केलं जात आहे; गुलाबराव पाटलांचा आरोप

Next

प्रशांत भदाणे

जळगाव: शिवसेनेतून चाळीस आमदारांनी बंड केले, चाळीस आमदार फुटले, पण फक्त मला टार्गेट केलं जात आहे. पुढच्या निवडणुकीत मला पाडण्यासाठीच हे सुरू आहे, असा आरोप राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. जळगाव तालुक्यातील फुपनगरी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमात भाषण करताना ते बोलत होते. 

आडवा केल्याशिवाय राहणार नाही

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, मी दलित, पीडित, शोषित, उपेक्षित सर्वांची काम करतो. त्यामुळे कोण खापर पंजोबा खाली येऊ दे, आडवा केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांना इशारा दिला. मंत्री झाल्यामुळे सांभाळून बोलावं लागतं, काही बोलायल लागला की टीव्हीवाले उलट सुलट काहीही दाखवतात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

...तर घरी बसेल

ते पुढे म्हणाले की, 40 आमदार फुटले, पण दुसरा कोणी सापडत नाही, एकटा गुलाबरावला पकडला आहे. त्यांना असं वाटतं की गुलाबराव पाटलाला टार्गेट करायचं आणि येत्या निवडणुकीत पाडून टाकायचं. पण मी कामावर बोलणार आहे, काम करूनही लोक माझ्या पाठीशी राहणार नसतील तर ठीक आहे, लोक जे न्याय देतील तो नम्रपणे स्वीकारेल आणि घरी बसेल, असंही ते म्हणाले.

Web Title: 40 MLAs split from Shiv Sena, but only I am being targeted; Gulabrao Patal's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.