मुक्ताईनगर येथे तीन दिवसात वाढले ४० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 06:39 PM2020-07-06T18:39:11+5:302020-07-06T18:40:15+5:30

तहसीलदारांच्या दालनात झालेल्या बैठकीत चार दिवस जनता कर्फ्यू वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

40 patients increased in three days at Muktainagar | मुक्ताईनगर येथे तीन दिवसात वाढले ४० रुग्ण

मुक्ताईनगर येथे तीन दिवसात वाढले ४० रुग्ण

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासन खडबडून जागेतातडीच्या बैठकीत घेतला चार दिवस जनता कर्फ्यू वाढवण्याचा निर्णय

मुक्ताईनगर, जि.जळगाव : शुक्रवार ते रविवार या केवळ तीन दिवसातच मुक्ताईनगर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांमध्ये अचानक वाढ होऊन केवळ तीन दिवसात ४० रुग्ण झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तहसीलदारांच्या दालनात झालेल्या बैठकीत चार दिवस जनता कर्फ्यू वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. वाढीव रुग्णांच्या दृष्टिकोनातून नवीन कोविड सेंटरची तत्काळ उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
२१ मार्चपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन असले तरी मुक्ताईनगर शहरात पहिला रुग्ण हा १ जून रोजी आढळला होता. त्यानंतर १५ दिवस रुग्णांची संख्या मर्यादितच होती, मात्र गेल्या तीन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवार ते रविवार या तीन दिवसातच ४० नवीन रुग्णांची भर पडली आहे. शहरातील सीडफार्म तसेच इतर हॉटस्पॉटच्या ठिकाणी कॉरोनाची साखळी तोडण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने पावले उचलायला सुरुवात केली आहे. सोमवारी सायंकाळी तहसीलदारांच्या दालनात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार श्याम वाडकर, नगराध्यक्ष नजमा तडवी, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष बंटी जैन, नगरसेवक संतोष मराठे, स्वीय सहायक प्रवीण चौधरी, शुभम शर्मा, तानाजी पाटील उपस्थित होते.
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील कोणत्या ठिकाणी नवीन कोविड सेंटर उभारण्यात यावे याची चर्चा झाली. शासकीय आयटीआय उचंदा, कृषी महाविद्यालयाची नवीन इमारत तसेच खडसे महाविद्यालयातील मुलींचे वसतिगृह या तीन ठिकाणच्या वास्तूंचा विचार करण्यात आला.
दरम्यान, तहसीलदार स्वत: शासकीय आयटीआय उचंदा येथील वास्तूची पाहणी करणार असून, त्यानंतर कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. नवीन वाढीवर रुग्णांच्या दृष्टिकोनातून जवळपास २०० खाटा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील हे स्वत: १०० खाटा उपलब्ध स्वखर्चातूून करून देणार असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. प्रशासनामार्फत अधिक १०० खाटा उपलब्ध करणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. नगरपंचायतीनेही या मोहिमेमध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. तसेच आशावर्कर व आशासेविका यांनी शहरात फिरून केलेल्या तपासणीचे मानधन नगरपंचायतीने लवकर द्यावे, अशी सूचनादेखील तहसीलदार वाडकर यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना केली. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलेश पाटील यांच्या कार्याचे कौतुक बैठकीत करण्यात आले.
जनता कर्फ्यूमध्ये चार दिवसांची वाढ
शुक्रवारी मुक्ताईनगर शहरात प्रथमच १० रुग्णांची वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर गेल्या बैठकीत ५ ते ७ जुलै असे तीन दिवस जनता कर्फ्यू करण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र केवळ तीन दिवसातच ४० रुग्णांची भर पडली. आज झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत जनता कर्फ्यूत पुन्हा चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आता जनता कर्फ्यू शनिवारपर्यंत म्हणजेच १० जुलैपर्यंत राहील. रविवारपासून व्यवहार सुरळीत करण्यात येईल.
जनता कर्फ्यूत नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. रविवारपासून सुरू होणाºया बाजारपेठेत बाहेरील व्यापाºयांनी सहभाग घेऊ नये अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. यासाठी व्यापाºयांनी सहकार्य करण्याचे आवाहन व्यापारी आघाडीचे अध्यक्ष बंटी जैन यांनी केले आहे.
 

Web Title: 40 patients increased in three days at Muktainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.