४० वर्षात शिवणी पाझर तलावाचा आटला नाही मायेचा पाझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 04:19 PM2019-06-21T16:19:15+5:302019-06-21T16:21:12+5:30

यंदाचा दुष्काळ ‘न भुतो न भविष्यती’ असाच ठरला. जिल्ह्यातील अनेक मोठी धरणे कोरडी पडली असताना छोट्या पाझर तलावांचे विचारणेच नको. शिवणी येथील वनहद्दीत असलेला पाझर तलाव मात्र यास अपवाद आहे. दहा कोसावरील आठ गावातील हजारो गुरा-ढोरांची तहान हा पाझर तलाव भागवत आहे. भीषण दुष्काळात तो या भागासाठी वरदान ठरला आहे.

In 40 years, the cistern of Pisaran pond does not get any illusion | ४० वर्षात शिवणी पाझर तलावाचा आटला नाही मायेचा पाझर

४० वर्षात शिवणी पाझर तलावाचा आटला नाही मायेचा पाझर

googlenewsNext
ठळक मुद्देदुष्काळाच्या जीवन रुपी झळादगडामंधी दडलाय जलभाव दुष्काळात भागली आठ गावातील गुरा-ढोरांची तहान अन् फुलली वनरोपवाटिका

संजय हिरे
खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : यंदाचा दुष्काळ ‘न भुतो न भविष्यती’ असाच ठरला. जिल्ह्यातील अनेक मोठी धरणे कोरडी पडली असताना छोट्या पाझर तलावांचे विचारणेच नको. शिवणी येथील वनहद्दीत असलेला पाझर तलाव मात्र यास अपवाद आहे. दहा कोसावरील आठ गावातील हजारो गुरा-ढोरांची तहान हा पाझर तलाव भागवत आहे. भीषण दुष्काळात तो या भागासाठी वरदान ठरला आहे.
४० वर्षात कोरडा नाहीच
शिवणी गावापासून दोन कि.मी.वर वनविभागात हा पाझर तलाव आहे. त्यास पूर्वापार देव्या, लवणाचे धरण’ हे नाव देव्या नावाच्या वेलवर्गीय वनस्पती या नाल्यात आढळते असे. त्यावरुन पडले आहे. १९७५ मध्ये या पाझर तलावाचे काम सुरू झाले ते १९७९-८० दरम्यान पूर्णत्वास आले. गाढवावरुन माती-मुरुम टाकत धरणाचा भराव घालण्यात आल्याचे पूर्वज सांगतात. तेव्हापासून हा पाझर तलाव एकदाही कोरडा पडलेला नाही. १९८५ पर्यंत या भागातून जामदा उजवा कालवा बारमाही पाण्याने वाही तेव्हा या पाझर तलावाचे महत्व कुणाला वाटले नाही. कालवा बसला तेव्हापासून मात्र तो वरदायी ठरत आहे. ४० वर्षात तो दुष्काळ असो की अवर्षण एकदाही कोरडा पडलेला नाही.
आठ गावाच्या गुराढोरांना वरदान
या पाझर तलावास लागून हजारो हेक्टर वनक्षेत्र आहे. वनास लागून महिंदळे, पळासखेडा, तरवाडे,ता. पारोळा, शिंदी, खेडगाव, बात्सर, शिवणी, वडगाव, नालबंदी ही आठ गावे येतात. रान जवळ असल्याने या गावातून पूर्वीपासून पशुपालन होते. गाय-गव्हारे आहे. एरव्ही जंगलात चरावयास जाणारी वरील गावांची जनावरे या पाझर तलावावरच पाणी पिण्यासाठी येतात. मात्र या दुष्काळात विहिरींनादेखील पाणी नाही. यामुळे इतरही हजारोच्या संख्येने असलेली गुरे-ढोरे या पाझरतलावाच्या पाण्यावर तहान भागवत आहेत. जगली आहेत.
वनविभागाची रोपवाटिकाही तरली
या पाझर तलावात उन्हाळ्यातही पाणी टिकून राहते म्हणून वनविभागाने येथे दोन वर्षांपासून वन रोपवाटिका उभारली आहे. या दुष्काळात यातील पाण्यामुळे एक लाखावर रोपांना जीवदान मिळाले आहे.
याशिवाय या तलावातील पाण्यावर मासेमारी चालते. दरवर्षी याचा लिलाव होतो.
पाझरतलाव नव्हे दगडी वॉटर टँक
या वनक्षेत्रातील इतर पाझर तलाव कोरडे पडले आहेत. मात्र भौगोलिक दृष्ट्या खोलगट दगडावर शिवणी पाझर तलावाचा बॅकवॉटर एरिया येतो. एरव्ही नावाप्रमाणे इतर पाझरतलावास थोडाफार पाझर खालच्या भागात होत असल्याने मार्च महिन्यापर्यंत ती कोरडी होतात. पण शिवणी पाझर तलावाचा एक टिपूसही (थेंब) खाली पाझरत नाही. हेच वैशिष्ट्य आहे. यामुळे हा पावसाळा ते पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी टिकून राहते. यामुळेच दुष्काळावर मात करण्यासाठी अशा दगडी वॉटरटँकची निर्मिती काळाची गरज आहे.



 

 

 

Web Title: In 40 years, the cistern of Pisaran pond does not get any illusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.