जळगाव जिल्ह्यात रासायनिक खते विक्रेत्यांसाठी 400 ‘इ पॉस’ यंत्र

By admin | Published: June 15, 2017 12:16 PM2017-06-15T12:16:00+5:302017-06-15T12:16:00+5:30

या यंत्रात शिल्लक खतसाठय़ाची माहिती समाविष्ट करता येत नसल्याने प्राप्त झालेले यंत्र कार्यरतही झालेले नसल्याची माहिती आहे

400 'E-pot' equipment for chemical fertilizer dealers in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात रासायनिक खते विक्रेत्यांसाठी 400 ‘इ पॉस’ यंत्र

जळगाव जिल्ह्यात रासायनिक खते विक्रेत्यांसाठी 400 ‘इ पॉस’ यंत्र

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15 - जिल्हाभरातील रासायनिक खते विक्रेत्यांना खत विक्रीचे व्यवहार इ पॉस यंत्राद्वारे करण्याच्या सूचना दिल्या, पण अद्याप फक्त 400 यंत्र प्राप्त झाले आहेत. यातच या यंत्रात शिल्लक खतसाठय़ाची माहिती समाविष्ट करता येत नसल्याने प्राप्त झालेले यंत्र कार्यरतही झालेले नसल्याची माहिती आहे.
जिल्हाभरात 1265 खत विक्रेते व वितरक आहेत. सर्व खतांची विक्री इ पॉस यंत्राच्या नियमनानुसार करायच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाने मे महिन्यात दिल्या होत्या. 1 जूनपासून ही प्रणाली लागू करायची होती, परंतु अद्यापही ही प्रणाली लागू झालेली नाही. पूर्वीप्रमाणेच खतांची विक्री सुरू आहे.
इ पॉस यंत्रात जे शेतकरी खत खरेदी करतील त्यांचा आधार क्रमांक व कुठल्याही बोटाचे ठसे घेतले जाणार आहेत. ही प्रणाली केंद्रीय खते मंत्रालयाशी निगडित असून, ऑनलाईन ही प्रक्रिया होईल. खते कुणाला व केव्हा व किती दिली याची नेमकी माहिती संकलानासाठी ही प्रणाली आहे.
या प्रणालीसाठी आवश्यक इ पॉस यंत्र केंद्र शासन पुरस्कृत 12 खत उत्पादक कंपन्या खते वितरकांना उपलब्ध करून देत आहेत.
अद्याप फक्त 400 यंत्र आले. ते बसविण्याचे काम जळगाव, अमळनेर, यावल, रावेर, जामनेरात सुरू आहे. आणखी 865 यंत्रांची आवश्यकता आहे.
यातच या यंत्रात सध्या खत विक्रेत्याकडे शिल्लक खत साठय़ाची नोंद घेतली जात नसल्याची अडचण येत आहे. ही नोंद केल्याशिवाय खते विक्रेते पुढील व्यवसायही करू शकत नाहीत किंवा शिल्लक खते परत करणेही त्रासदायक आहे. हा सर्व गोंधळ सुरू असल्याने ही प्रणाली लागू होण्यास उशीर लागत असल्याची माहिती जि.प.च्या कृषी विभागातून मिळाली.

Web Title: 400 'E-pot' equipment for chemical fertilizer dealers in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.