सायकल रॅलीत ४०० जणांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:14 AM2021-01-17T04:14:57+5:302021-01-17T04:14:57+5:30
जळगाव : `सायकल चालवा रोगराई पळवा ` या उपक्रमा अंतर्गंत शनिवारी सकाळी उपमहापौर सुनील खडके या सहकार्यातुन सायकल ...
जळगाव : `सायकल चालवा रोगराई पळवा ` या उपक्रमा अंतर्गंत शनिवारी सकाळी उपमहापौर सुनील खडके या सहकार्यातुन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदा रिक्षा स्टॉप पासून निघालेल्या या रॅलीत ४००जणांनी सहभाग घेतला.
महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, भाजपाचे महानगरध्यक्ष दीपक सुर्यवंशी, उपायुक्त संतोष वाहुळे,नगरसेवक कैलास सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत, माजी नगरसेवक मनोज काळे, कुंदन काळे, चंदन महाजन, समीर रोकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ही रॅली कोर्ट चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, डी मार्ट, लांडोरखोरी उद्यान व पुन्हा त्याच मार्गाने १० किलोमीरचे अंतर कापून गोविंदा रिक्षा स्टॉप येथे पोहचली. डांभुर्णी येथील निलेश कोळी व जळगावच्या संभाजी पाटीलने लवकर हे अंतर कापल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.सहभागी सायकल पट्टूंना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. या सायकल रॅलीत रिसायकल सायकलिस्ट ग्रृप, नवोदय निर्माण फाऊंडेशन, नीलेश बॉक्सींग क्लब आदींनी संस्थांनी सहभाग घेतला.