जळगाव व धरणगाव तालुक्यातील ६ व्यायामशाळांसाठी ४२ लाखांचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 04:51 PM2017-12-09T16:51:28+5:302017-12-09T16:56:02+5:30

सहकार राज्यमंत्र्यांच्या हस्ते मंजुरी आदेशाचे सरपंचांना वितरण

42 lakhs sanctioned for 6 gymnasiums in Jalgaon and Dharangaon taluka | जळगाव व धरणगाव तालुक्यातील ६ व्यायामशाळांसाठी ४२ लाखांचा निधी मंजूर

जळगाव व धरणगाव तालुक्यातील ६ व्यायामशाळांसाठी ४२ लाखांचा निधी मंजूर

googlenewsNext
ठळक मुद्देधरणगाव व जळगाव तालुक्यातील प्रत्येकी तीन गावात व्यायामशाळाजिल्हाधिकाºयांनी दिली प्रशासकीय मान्यतागुलाबराव पाटील यांच्या हस्ते मंजुरी आदेशाचे वितरण

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.९ - जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत व्यायाम शाळा विकास अनुदान योजना राबवली जाते. सन २०१७-१८ या चालू वर्षात जळगांव ग्रामीण मतदारसंघात ६ व्यायामशाळा बांधकामासाठी ४२ लक्षाचा निधी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजूर करण्यात आला
धरणगाव तालुक्यातील चांदसर, फुलपाट, व चोरगाव तर जळगांव तालुक्यातील सुभाषवाडी, नांद्रा खुर्द व उमाळे या ६ गावांना प्रत्येकी ७ लाखाप्रमाणे ४२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या ६ व्यायामशाळाच्या बांधकामासाठी जिल्हाधिकाºयांनी ६ डिसेंबर रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. ही काम त्वरित सुरू करण्याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांना जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी ७ डिसेंबर रोजी पत्र दिलेले आहे.

या बाबत पाळधी कार्यालयात जळगांव व धरणगाव तालुक्यातील सरपंच व कार्यकर्ते यांना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यायामशाळेचे बांधकाम मुदतीत करून उत्कृष्ट दर्जाचे करण्यात यावे असे सांगितले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी सरपंचाना मंजुरी आदेश पत्रही दिले.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, जळगाव तालुका प्रमुख नरेंद्र सोनवणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, सचिन पवार, देवीदास कोळी, धानवडचे जनार्दन पाटील, मुकुंद नन्नवरे, वासुदेव सोनवणे उपस्थित होते.

Web Title: 42 lakhs sanctioned for 6 gymnasiums in Jalgaon and Dharangaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.