उद्योजकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून ४२ हजाराची बॅग लांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 09:29 PM2017-09-26T21:29:31+5:302017-09-26T21:32:22+5:30
कंपनीत लागणारा कच्चा माल घेण्यासाठी घरातून ४१ हजार ८०० रुपये घेऊन कंपनीत गेलेले उद्योजक रमेश पांडुरंग इंगळे (वय ६७ रा.सदगुरु नगर, एमआयडीसी जळगाव) यांच्या दुचाकीची डिक्की उघडून चोरट्यांनी ही रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना मंगळवारी एमआयडीसीतील व्ही सेक्टर भागात घडली. दरम्यान, वर्णनावरुन अवघ्या तासाभरातच पोलिसांनी दोन्ही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२६ : कंपनीत लागणारा कच्चा माल घेण्यासाठी घरातून ४१ हजार ८०० रुपये घेऊन कंपनीत गेलेले उद्योजक रमेश पांडुरंग इंगळे (वय ६७ रा.सदगुरु नगर, एमआयडीसी जळगाव) यांच्या दुचाकीची डिक्की उघडून चोरट्यांनी ही रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना मंगळवारी एमआयडीसीतील व्ही सेक्टर भागात घडली. दरम्यान, वर्णनावरुन अवघ्या तासाभरातच पोलिसांनी दोन्ही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रमेश इंगळे यांची औद्योगिक वसाहत भागात व्ही सेक्टरमध्ये प्लाट क्र.९५/१ मध्ये त्रिभुवन इलेक्ट्रीकल नावाची ट्रान्सफार्मर दुरुस्तीची कंपनी आहे. कंपनीत लागणारा कच्चा माल घ्यावयाचा असल्याने इंगळे यांनी घरातून ४१ हजार ८०० रुपये घेतले व ते एका बॅगेत ठेवून ती बॅग दुचाकीच्या (क्र.एम.एच.१९ बी.एन.७६१२) डिक्कीत ठेवले. दुपारी तीन वाजता ते कंपनीत गेले असता तेथून बॅग लांबविण्यात आली.
चोरट्याला घरातच पकडले
बॅग लांबविल्याची माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक सुनील कराडे यांनी तत्काळ शरद भालेराव यांना गुन्हेगारांचे वर्णन सांगितले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट अजय बिरजु गारुंगे याचे कंजरवाड्यातील घर गाठले. त्याने गुन्ह्याची कबुली देतानाच सोबत असलेल्या विकास राजू गुमाने उर्फ हाड्या याचे नाव सांगितले. अजयला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर गोविंदा पाटील या कर्मचाºयाने हाड्यालाही ताब्यात घेतले. सहायक निरीक्षक समाधान पाटील, उपनिरीक्षक रोहन खंडागळे,निलेश पाटील, अविनाश देवरे, भरत लिंगायत, जितेंद्र राजपूत,विजय नेरकर यांच्या मदतीने रक्कमही हस्तगत करण्यात आली.