पाटणादेवी जंगलात चंदनाच्या ४२८ झाडांची कत्तल, दोन अधिकारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 23:56 IST2021-06-10T23:55:31+5:302021-06-10T23:56:05+5:30
चाळीसगाव : दोन अधिकारी निलंबित

पाटणादेवी जंगलात चंदनाच्या ४२८ झाडांची कत्तल, दोन अधिकारी निलंबित
चाळीसगाव/जळगाव : कोरोना महामारीतील टाळेबंदी पाटणादेवी जंगल परिसरात चंदन तस्करांच्या पथ्यावरच पडली आहे. या तस्करांनी चंदनाच्या हिरव्यागार झाडावर कुऱ्हाड चालविल्याचे उघड झाले आहे. वनविभागाच्या पाहणीत ४२८ झाडे अवैधरित्या तोडल्याचे तर ५९३ झाडांनाही इजा पोहचविल्याचे आढळून आले आहे.
याप्रकरणी वनपाल बी.एस. जाधव, वनरक्षक नंदू देसले यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच निवृत्त वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी एम.डी. चव्हाण यांच्यावरही दोषारोप ठेवण्यात आले आहेत