२२ डॉक्टरांसह ४३ जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:30 AM2021-03-13T04:30:06+5:302021-03-13T04:30:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या चार ते पाच दिवसांपासून २२ डॉक्टरांसह ४३ जणांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या चार ते पाच दिवसांपासून २२ डॉक्टरांसह ४३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मोठ्या प्रमाणावर डॉक्टर आणि कर्मचारी बाधित झाल्यामुळे या ठिकाणच्या अन्य डॉक्टरांवर मोठा भार वाढला आहे.
बाधितांमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळेची जबाबदारी असलेले सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांचाही समावेश आहे. त्यांनीही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली आहे. डॉक्टरांमध्ये काही प्रमुख डॉक्टरांचाही समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आधीच मनुष्यबळाची चिंता असताना इतक्या मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाधित आढळून आल्याने अन्य डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर भार वाढला आहे. यात कोविड आणि नॉन कोविडचे नियोजन करताना यंत्रणेची तारांबळ होत आहे.
असे आहे बाधित
डॉक्टर २२
परिचारिका १७
तंत्रज्ञ ३
फार्मासिस्ट १