व्हर्च्युअल पेंशन अदालतीत ४३ प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 02:39 PM2020-06-15T14:39:26+5:302020-06-15T14:39:51+5:30

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील कार्मिक विभागातर्फे सेवानिवृत रेल्वे कर्मचा-यांच्या पेंशन संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी व्हर्च्युअल पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले.

43 cases settled in virtual pension court | व्हर्च्युअल पेंशन अदालतीत ४३ प्रकरणे निकाली

व्हर्च्युअल पेंशन अदालतीत ४३ प्रकरणे निकाली

Next

भुसावळ : मध्य रेल्वेच्याभुसावळ विभागातील कार्मिक विभागातर्फे सेवानिवृत रेल्वे कर्मचा-यांच्या पेंशन संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी व्हर्च्युअल पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले. यात आलेली सर्व ४३ प्रकरणे निकाली काढण्यात आली व त्यावर चर्चा करून त्यांना ४ लाख २७ हजार ९३५ रू. देय रक्कम एनईएफटीव्दारे सेवानिवृत रेल्वे कर्मचा-यांच्या खात्यात तत्काळ वर्ग करण्यात आले.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी व्हर्च्युअल पेंशन अदालतीत मार्गदर्शन केले.
कोव्हीड १९ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या व्हर्च्युअल पेंशन अदालतीचे सेवानिवृत कर्मचारी व त्यांच्या संघटनेने यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल कौतुक केले.

Web Title: 43 cases settled in virtual pension court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.