४३६ कोटी की वाढीव निधी मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:16 AM2021-02-10T04:16:57+5:302021-02-10T04:16:57+5:30
जळगाव : जिल्हा वार्षिक योजनांसाठी तयार करण्यात आलेला व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेला ४३६ कोटी ...
जळगाव : जिल्हा वार्षिक योजनांसाठी तयार करण्यात आलेला व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेला ४३६ कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा बुधवार, १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत सादर करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
वार्षिक योजनांच्या निधी संदर्भात जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिलेल्या आराखड्यांविषयी राज्यस्तरीय बैठक वित्तमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत १० रोजी नाशिक येथे होणार आहे. गेल्या वर्षी ३०० कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा सादर करण्यात येऊन वाढीव ७५ कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार यंदा ४३६ कोटींचा प्रारुप आराखडा सादर झाल्यानंतर तेवढ्याच रकमेला वाढीव मागणीलाही मान्यता मिळते, याकडे विविध यंत्रणांचे लक्ष लागले आहे.
लोकप्रतिनिधींपैकी जिल्ह्याचे दोन्ही खासदार दिल्ली येथे अधिवेशनाला गेलेले आहेत. तर आमदार या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत अनिश्चितता आहे.