सर्वेक्षणात आढळल्या ४३७ गळत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 11:15 AM2019-02-10T11:15:39+5:302019-02-10T11:15:47+5:30

२९५ कामे केली तातडीने पूर्ण

437 leakage detected in the survey | सर्वेक्षणात आढळल्या ४३७ गळत्या

सर्वेक्षणात आढळल्या ४३७ गळत्या

Next
ठळक मुद्दे १४२ ठिकाणांहून अद्यापही होतेय पाण्याची नासाडी

जळगाव : शहरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने गळत्या व त्यातून होणारी पाण्याची नासाडी या विषयावर ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध वृत्ताची दखल घेऊन शहरातील गळत्यांबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश होते. पाणी पुरवठा विभागाच्या विभाग कार्यालयांनी केलेल्या पाहणीत सुमारे ४३७ लहान मोठ्या गळत्या आढळून आल्या असून २९५ गळत्या बंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र अद्यापही अनेक ठिकाणांहून पाण्याचा अपव्यय हा सुरूच असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
वाघूर धरणात यंदा जेमतेम पाणी साठा शिल्लक आहे. ही बाब लक्षात घेऊन शिल्लक असलेला साठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने आरक्षित केला आहे. तसेच भविष्यात शहरास गंभीर अशा पाणी समस्येला सामोरे जावे लागू नये म्हणून तीन किंवा चार दिवसांआड पाणी पुरवठा केला जावा अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेस करण्यात आल्या आहेत.
नागरिकांसाठी काटकसर पण गळत्यांमुळे पाणी अपव्यय
नागरिकांसाठी पाण्याची कपात करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तर दुसरीकडे वाघूर धरणाच्या नजीक असलेल्या शेतांमधून शेकडो पंप लावून सुरू असलेली पाण्याची चोरी व वाघूर धरणापासून शहरापर्यंत येणाऱ्या पाईप लाईनवरील गळती तसेच शहरातील विविध भागातून जाणाºया पाईप लाईनरील गळतीमुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात असते. शहरातील पाणी पुरवठ्यासाठी मनपा ज्या प्रमाणात पाणी उचलते त्यांच्या ३० टक्के पाणी हे रोज वाया जात असल्याचा मनपाचा अहवाल आहे. या व्यतिरिक्त शहरातील गळत्यांचा विचार केल्यास हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत असल्याची भितीही व्यक्त केली जात आहे.
पाण्याचा प्रचंड अपव्यय सुरूच
शहरात पाणी पुरवठा विभागाचे ९ युनिट कार्यालय आहेत. या कार्यालयांना त्यांच्या क्षेत्रातील गळत्यांची महिना भरातील माहिती सादर करण्याचे आदेश होते. त्यानुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शहरात ४३७ ठिकाणी लहान, मोठ्या गळत्या आढळून आल्याचे या अहवालात नमुद आहे. त्यापैकी २९५ गळत्या तातडीने बंद करण्यात आल्या असल्याचे कळविले असून १४२ गळत्या अद्यापही कायम असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
मनपा तसेच जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवरून ‘लोकमत’ने शहरात पाणी पुरवठ्याच्या पाईप लाईन वरून होणाºया गळत्या व पाण्याचा होत असलेला अपव्यय याबाबत नागरिकांना आवाहन करून माहिती कळविण्याच्या सूचना केल्या होत्या. नागरिकांनी त्यास उस्फूर्त प्रतिसाद देऊन आपापल्या भागातील गळत्यांची माहिती छायाचित्रासह पाठविली होती. या संदर्भात प्रसिद्ध वृत्ताची दखल घेऊन उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी पाणी पुरवठा विभागास शहरातील गळत्यांचे सर्वेक्षण करून माहिती सादर करण्याचे आदेश केले होते. त्यानुसार शनिवारी हा अहवाल सादर करण्यात आला.

Web Title: 437 leakage detected in the survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.