अलिशान कारमधून जाणारा ४४ लाखाचा गांजा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:32 PM2019-03-09T12:32:51+5:302019-03-09T12:34:39+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री भडगाव-चाळीसगाव रस्त्यावर ओझर गावाजवळ पाठलाग करुन ४४ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा गांजा, २६ लाख रुपये किमतीच्या दोन अलिशान कार व दोन लाखाचे मोबाईल असा ७० लाख ७० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

44 lacquer ganja caught on the car by a car | अलिशान कारमधून जाणारा ४४ लाखाचा गांजा पकडला

अलिशान कारमधून जाणारा ४४ लाखाचा गांजा पकडला

Next
ठळक मुद्दे एलसीबीची चाळीसगावात कारवाई  दोन वाहनांसह तिघांना अटक ७० लाखाचा ऐवज जप्त

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री भडगाव-चाळीसगाव रस्त्यावर ओझर गावाजवळ पाठलाग करुन ४४ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा गांजा, २६ लाख रुपये किमतीच्या दोन अलिशान कार व दोन लाखाचे मोबाईल असा ७० लाख ७० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 दरम्यान, या प्रकरणात शुभम किरण राणा (वय २२), भूषण केशव पवार (वय ३२) दोन्ही रा.डाळवाली खळे, चाळीसगाव व रवींद्र गुलाबराव शिंदे (वय ५३, रा.जुना सातारा कडू प्लॉट, भुसावळ) या तिघांना अटक करण्यात आली असून अन्य चार जण फरार झाले आहेत. अटकेतील तिघांविरुध्द चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अमंली पदार्थाची तस्करी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईसाठी ठिकठिकाणी नेमले पथक
अकोला येथून दोन अलिशान कारमधून (क्र.एम.एच.१४ ए.एन.६५३२ व एम.एच.१५ जी.एल.१७६१) चाळीसगाव शहरात गांजा येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना मिळाली होती. त्यानुसार रोहोम यांनी त्यांचे सहकारी रामकृष्ण पाटील व महेश पाटील यांना खात्री करुन पुढील कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. अकोला येथून कार निघून त्या मध्यरात्री दोन वाजेपर्यंत चाळीसगावात पोहचणार असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर रोहोम यांनी सहायक निरीक्षक रवींद्र बागुल, महेश जानकर, रामचंद्र बोरसे, संजय सपकाळे, रामकृष्ण पाटील, महेश पाटील, विनयकुमार देसले, रवींद्र भगवान पाटील, किरण चौधरी, दत्तात्रय बडगुजर, योगेश वराडे, अशरफ शेख, इद्रीसखान पठाण यांचे पथक तयार केले तर विजय पाटील व नरेंद्र वारुळे हे तांत्रिक माहिती मिळवून पथकाला देत होते. या कर्मचाºयांची विभागणी करुन ठिकठिकाणी पथके नेमण्यात आली होती. ओझर गावाजवळ ही कारवाई यशस्वी झाली.

Web Title: 44 lacquer ganja caught on the car by a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.