45 लाखांच्या सिगारेट लांबविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 12:49 AM2017-01-28T00:49:03+5:302017-01-28T00:49:03+5:30
गोडाऊनमधून चोरटय़ांनी 45 लाखांच्या सिगारेट व दोन लाख रूपये रोख असा एकूण 47 लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना 27 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली
जळगाव : शहरातील भजे गल्ली परिसरातील चोपडा मार्केटमधील गोडाऊनमधून चोरटय़ांनी 45 लाखांच्या सिगारेट व दोन लाख रूपये रोख असा एकूण 47 लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना 27 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली ़ गोडाऊनमधील सीसीटीव्हीत चोरीचा प्रकार कैद झाला असून दोन चारचाकी गाडय़ामधून चोरटय़ांनी सिगारेटचा 67 खोके एवढा माल वाहून नेला़ सीसीटीव्ही फुटेजनुसार सात ते आठ जणांनी चोरीचा केल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आह़े पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर तसेच पोलीस गस्तीदरम्यान गुरूवारी पहाटे 12 ते 3 वाजेदरम्यान ही घटना घडली हे विशेष़
खोटेनगर परिसरातील दादावाडी येथील रहिवासी सुरेश पुंडलिक पाटील यांचे भारद्वाज नावाने एजन्सी आह़े तसेच संतोष ट्रेडर्स नावाने त्यांचे भाऊ रामचंद्र पाटील यांची एजन्सी आह़े दोघे वेगवेगळ्या कंपनीचे सिगारेटचे किरकोळ विक्रेते आहेत़
सीसीटीव्ही कॅमे:यांमध्ये प्रकार कैद
सुरेश पाटील यांचे कार्यालय व गोडावून तसेच शेजारच्या संतोष मेडीकल असे एकूण 11 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत़ गोडावून व कार्यालय असे एकूण चार व बाहेर एक असे पाच कॅमे:यांमध्ये चोरटे कैद झाले आहेत़ शटर उघडताना, माल वाहून नेताना, गाडीत माल भरताना असे एकूण चार जण दिसून येत आह़े एक जण दुकानातून शटर र्पयत माल पोहचत असून इतर तीघे गाडीत माल भरताना दिसून येत आहेत़ यादरम्यान चोरटय़ांनी 67 वेगवेगळ्या कंपन्यांच्या सिगारेटचे खोके व वरच्या मजल्यावरील कार्यालयाच्यातून पिशवीत ठेवलेले दोन लाख रूपयांची रोख असा एकूण 47 लाखांचा ऐवज लांबविला़ कारमध्ये माल भरत असताना त्यात माल बसत नव्हता़ जास्तीत जास्त माल नेता यावा यासाठी चोरटय़ांनी शक्कल लढविली़ चोरटय़ांनी खोके फाडले व त्यातून सिगारेटचे पाकिट भरून घेतले घेतल़े अशा प्रकारे चोरटय़ांनी घटनास्थळी सिगारेट काढून घेत सात रिकामे खोके घटनास्थळी फेकल्याचे फुटेजमध्ये दिसून येत आह़े सकाळी कचरा वेचणारे रिकामे खोके घेवून गेले असावेत असा अंदाज आह़े
दोन चारचाकीचा वापर
12 वाजेच्या सुमारास प्रारंभी दोन जण घटनास्थळी आल़े त्यांनी भजे गल्लीपरिसर टेहळणी केली़ यानंतर पुन्हा दुकानाजवळ तीन जण एकत्र आल़े त्यापैकी दोघांनी शटरचे कुलूप तोडल़े यानंतर तिघापैकी एक जण आतमध्ये शिरला़ त्याने आतील लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून मालाची खात्री केली व तो पुन्हा बाहेर आला़ काही वेळाने चार चाकीत तीन जणांनी सिगारेटचे खोक्यांचा माल भरला़ माल भरल्यावर 27 मिनिटांनंतर ही गाडी रवाना झाली व काही सेकंदाच दुसरी पांढ:या रंगाची कार घटनास्थळी आली़ यामध्ये उर्वरीत माल भरला व 2 वाजून 40 मिनीटांनी चोरटे रवाना झाल़े