मुक्ताईनगरात पोषण आहार शिजविण्याचे 45 लाखाचे अनुदान रखडले
By admin | Published: June 17, 2017 05:36 PM2017-06-17T17:36:41+5:302017-06-17T17:36:41+5:30
पोषण आहार शिजविण्यासाठी शासनाकडून देण्यात येणारे धान्य वगळता लागणारी
ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर, जळगाव, दि. 17 - तालुक्यातील 200 अंगणवाडय़ांमध्ये पोषण आहार शिजविणा:या 131 महिला बचत गटांचे गेल्या 6 महिन्यांचे 45 लाख रुपये अनुदान थकले आहे.
पोषण आहार शिजविण्यासाठी शासनाकडून देण्यात येणारे धान्य वगळता लागणारी इतर सामुग्री व भाजीपाला आदींवर बचत गटांकडून खर्च केला जातो. आहार शिजविण्याचे जवाबदारी पार पाडली जाते यासाठी एकात्मिक बालविकास विभागाकडून विद्यार्थी संख्येवर निर्धारित रक्कम बचत गटांना महिन्याकाठी अदा केली जाते.
तालुक्यातील 131 बचत गटांना जानेवारी महिन्यापासून अद्यापही अनुदान देण्यात आले नाही. जून महिना निम्मा उलटला, मात्र अनुदान नसल्याने बचत गट आर्थिक अडचणीत सापडले आहे. अनेक बचत गटाच्या महिला एकात्मिक बालविकास कार्यालयाच्या चकरा मारीत आहे.