पहूर येथील माजी विद्यार्थ्यांकडून शहिद कुटुंबियांना ४५ हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 05:06 PM2018-12-28T17:06:57+5:302018-12-28T17:09:36+5:30

आर.टी.लेले विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी संवगडी ग्रुपच्या माध्यमातून ४५ हजाराचा निधी संकलित केला. हा निधी परभणी जिल्ह्यातील शहिद जवान शुभम मुस्तापूरे यांच्या कुटुंबाला कोनेरवाडी या गावात जाऊन देण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

45 thousand help from Shaheed family members from Shaheed students | पहूर येथील माजी विद्यार्थ्यांकडून शहिद कुटुंबियांना ४५ हजारांची मदत

पहूर येथील माजी विद्यार्थ्यांकडून शहिद कुटुंबियांना ४५ हजारांची मदत

Next
ठळक मुद्देपहूर येथील लेले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा पुढाकारपरभणी जिल्ह्यातील कोनेरवाडी येथील शहिद जवानाच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातसवंगडी ग्रुपच्या माध्यमातून केले होते आवाहन

पहूर, ता.जामनेर : आर.टी.लेले विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी संवगडी ग्रुपच्या माध्यमातून ४५ हजाराचा निधी संकलित केला. हा निधी परभणी जिल्ह्यातील शहिद जवान शुभम मुस्तापूरे यांच्या कुटुंबाला कोनेरवाडी या गावात जाऊन देण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
आर.टी.लेले विद्यालयातील सन १९९० च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी सोशल मिडियावर संवगडी ग्रुपची निर्मिती केली. या माध्यमातून ग्रुपमधील मित्रांनी विधायक कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात शेतकरी, अधिकारी, छोटे मोठे उद्योग करणारे, तसेच नोकरदार या सर्वांचा त्यात समावेश आहे.
शहिद जवानासाठी ४५ हजारांचा निधी संकलन
परभणी जिल्ह्यातील कोनेरवाडी येथील रहिवासी सुनिता व सुर्यकांत मुस्तापुरे यांचा सुपुत्र शुभम मुस्तापुरे हा शहिद झाला. सर्वात कमी वयाचा हा जवान होता. या परिवाराची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने मदतीचा हात देण्यात आला. ग्रुपमधील सदस्य शरद बाबूराव पांढरे, शरद वैजनाथ पांढरे, अरूण कुमावत, अमृत बारी, सुपडू मोरे, प्रवीण नागपूरे यांनी घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांचे सांत्वन करीत ४५ हजारांचा मदतीचा हात दिला आहे.

Web Title: 45 thousand help from Shaheed family members from Shaheed students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.