450 वीज कनेक्शन बंदची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2017 12:26 AM2017-04-05T00:26:43+5:302017-04-05T00:26:43+5:30
कारवाईचा बडगा : भडगाव तालुक्यात विविध ग्राहकांकडे 7 कोटींवर थकबाकी
भडगाव : तालुक्यात वीज वितरण कंपनीची घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच पाणीपुरवठा योजनांची सर्व मिळून एकूण 7 कोटी 51 लाखाची थकबाकी आहे. आतार्पयत 1 कोटी 70 लाखांच्या जवळपास थकीत वीज बिलाची वसुली करण्यात आली आहे. तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या उपविभागात वीज बिल थकबाकी वसुली मोहीम सुरू आहे. थकबाकीदारांनी त्वरित वीज बिले भरावीत असे आवाहन वीज कंपनीचे उपअभियंता आर.बी.शुक्ला यांनी केले आहे.
तालुक्यातील वीज बिलांची एकूण 3 कोटी 33 लाखांची थकबाकी होती. पैकी आतापावेतो 1 कोटीच्या जवळपास थकीत वसुली करण्यात आली आहे. अद्याप 2 कोटी 37 लाख रुपये वीज बिल थकबाकी आहे.
तालुक्यात गावांना पाणीपुरवठा करणारे 110 ग्राहक आहे. त्यांच्याकडे आतार्पयत 4 कोटी 18 लाख रु.ची थकबाकी आहे. आजर्पयत पाणीपुरवठा योजनेची 6 लाखाच्या आसपास वीज बिल वसुली झाली आहे. शासनाच्या प्रोत्साहन योजनेत मुद्दलच्या 20 टक्के व चालू बिल भरुन या योजनेचा लाभ ग्राहकांना मिळू शकतो अशी वीज वितरणच्या सूत्रांनी माहिती दिली. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक असे एकूण 450 वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी बंद करण्यात आला आहे. नुकतेच जळगाव वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता जनवीर, पाचोरा कार्यकारी अभियंता गरुड आदींनी वीज बिल वसुली मोहीमबाबत बैठक घेवून मार्गदर्शन केले. तालुक्यात वीज कंपनीचे अधिका:यांसह कर्मचा:यांच्या प्रयत्नातून थकीत वीज बिलांची वसुली मोहीम सुरू आहे तरी थकबाकीदारांनी त्वरित वीज बिलाची रक्कम भरावी व वीज मंडळास सहकार्य करावे असे आवाहन भडगाव वीज कंपनीचे उपअभियंता शुक्ला यांनी केले आहे.
तालुक्यात थकबाकीदार वीज बिलांची मोहीम राबवली जात आहे. आतापावेतो 1 कोटी 6 लाखाच्या जवळपास वसुली झाली आहे तर 450 थकीत वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी बंद करण्यात आला आहे. ही वसुली मोहीम सुरुच राहणार असून ग्राहकांनी कारवाईची कटू वेळ आणू नये.
- आर.बी.शुक्ला,
उपअभियंता वीज वितरण कंपनी भडगाव