जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे डिसेंबर महिन्यात ४५१० प्रकरणे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:16 AM2021-01-23T04:16:31+5:302021-01-23T04:16:31+5:30
जळगाव : जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे मोठ्या प्रमाणावर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा व पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ...
जळगाव : जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे मोठ्या प्रमाणावर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा व पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज सादर केले जात असून, यामध्ये डिसेंबर २०२० या महिन्यामध्ये चार हजार ५१० प्रकरणे प्राप्त झाले आहेत. यापैकी ९५० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे.
पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. समितीकडे डिसेंबर २०२० या महिन्यामध्ये चार हजार ५१० प्रकरणे प्राप्त झाली असून, त्या अनुषंगाने समिती अशा विद्यार्थ्यांचे जातिदावा प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे कामकाज करीत आहे. समितीने ११ ते २२ जानेवारी या कालावधीत ९५० विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रमाणपत्र संबंधित विद्यार्थ्यांच्या ई-मेलवर पाठविले आहे.
ज्या विद्यार्थ्यांच्या प्रस्तावांमध्ये त्रुटी आहेत अशा विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्तता केल्यावर त्यांचाही निपटारा करण्याचे काम समितीस्तरावर सुरू असून, विद्यार्थ्यांनी त्रुटीची पूर्तता तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्यांनी केले आहे.