जळगाव जिल्ह्यात ६२४ पैकी ४५७ शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 01:10 PM2018-11-03T13:10:21+5:302018-11-03T13:12:09+5:30

१६७ शाळा सुरू

457 schools out of 624 in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात ६२४ पैकी ४५७ शाळा बंद

जळगाव जिल्ह्यात ६२४ पैकी ४५७ शाळा बंद

Next
ठळक मुद्देआंदोलन यशस्वी झाल्याचा दावादोन तालुक्यात शंभर टक्के बंद

जळगाव : रिक्त जागांची भरती प्रक्रिया, अत्यंत तटपुंजे मिळणारे शिक्षकेतर अनुदान यासह अनेक मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी अनुदानित खाजगी शाळा संस्थाचालकांकडून ह्यशाळा बंदह्ण आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनाला जळगाव शहरासह जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला़ ६२४ खाजगी अनुदानित शाळांपैकी तब्बल ४५७ शाळा बंद होत्या तर १६७ शाळा या सुरू होत्या़
सुरू असलेल्या काही शाळा परीक्षा असल्यामुळे आंदोलनात सहभागी झाल्या नाहीत़ मात्र, ज्या शाळांनी सहभाग नोंदविला त्या शाळांमध्ये शुक्रवारी होणारा पेपर हा शनिवारी होणार आहे़ दरम्यान, आंदोनाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा संस्थाचालक संघटनेने केला आहे़
खासगी शिक्षण संस्थाचालकांकडून अनेकवेळा शासनाकडे आपल्या मागण्या मांडल्या. त्याचा पाठपुरावाही वारंवार केला. मात्र शिक्षण संस्थेच्या ह्या मागण्याकडे शासनाचे दुर्लक्षच होत असल्याने संस्थाचालकांकडून शुक्रवारी हा बंद पुकारण्यात आला़ जळगाव जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, शिक्षक शिक्षकेतर संघटानांनी आंदोनाला पाठींबा दर्शविला़
शाळा परिसरात शुकशुकाट
जळगाव शहरातील पिंप्राळा, गणेश कॉलनी, बी़जे़ मार्केट तसेच मू़जे़ महाविद्यालय परिसरविद्यार्थ्यांनी गजबजेला असतो़ परंतू,शाळा बंद आंदोलनामुळे शुकशुकाट दिसून आला़ ज्या शाळांमध्ये परीक्षा घेण्यात आल्या त्या शाळांमध्ये दुपारी १ वाजेनंतर शुकशुकाट पहायला मिळाला़
दोन तालुक्यात शंभर टक्के बंद
बोदवड तालुक्यातील १३ खाजगी अनुदानित शाळा तर मुक्ताईनगरातील २२ शाळा पूर्ण बंद होत्या़ अमळनेर येथील ५०, भुसावळ २१, भडगाव ३५, चाळीसगाव ५०, चोपडा ३०, धरणगाव १५, एरंडोल २१, जामनेर २७, पारोळा २, पाचोरा ५४, रावेर ४२, यावल ३० तर जळगावातील ४५ शाळा बंद होत्या़
काही शाळांमध्ये झाली परीक्षा
शहरासह जिल्ह्यातील १६७ सुरू असलेल्या शाळांपैकी काही शाळांमध्ये शुक्रवारी परीक्षा पार पडल्या़ तर दुसरीकडे ज्या शाळांनी आंदोलनात सहभाग नोंदविला, त्या शाळेतील शुक्रवारचा पेपर हा शनिवारी घेण्यात येणार आहे़ तसेच सुरू असलेल्या काही शाळांमध्ये विद्यार्थी दिसून आले नाही़ मात्र, शिक्षक पेपर तपासतांना दिसून आले़ इंग्लिश मीडियमच्या शाळा सुरूच होत्या़

जिल्ह्यातून शाळा बंद आंदोनाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे़ फक्त काही शाळा सुरू होत्या़ मात्र, त्या शाळांमध्ये विद्यार्थी आलेले नव्हते़ शासनाने मागण्या लवकरात लवकर मान्य न केल्यास बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्यात येईल़
- अरविंद लाठी, कार्याध्यक्ष, जिल्हा शैक्षणिक संस्थाचालक संघटना

Web Title: 457 schools out of 624 in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.