47 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Published: January 15, 2017 01:01 AM2017-01-15T01:01:17+5:302017-01-15T01:01:17+5:30

भालोदला तणावपूर्ण शांतता : फलक हटवले, परस्परविरोधी गुन्हे

47 cases filed against them | 47 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

47 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next


यावल/भालोद : फलक फाडल्याच्या कारणावरून भालोदला उफाळलेल्या  वादप्रकरणी दोन्ही गटांतील 47 जणांविरुद्ध परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आल़े संशयित आरोपींमध्ये बाजार समितीचे सभापती नारायण चौधरी यांचाही समावेश आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीने गावातील सर्वच फलक हटवले आहेत़ पोलिसांचा तगडा बंदोबस्त गावात कायम असून तणावपूर्ण शांतता आह़े
दरम्यान, फलक काढण्याबाबत ज्यांनी पोलीस ठाण्यात अर्ज केला होता त्यांनीच हे काम केल्याचा आरोप एका गटातर्फे भारत भालेराव यांनी फिर्यादीत केला आह़े त्यावरून 27  आरोपींविरुद्ध भादंवि कलम 143, 147, 295 तसेच अनुसूचित जाती 1, अनुसूचित जमाती प्रती सुधारणाचे कलम 3 (1) (4), 3 (1), (6) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कृउबा सभापती नारायण शशिकांत चौधरी यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. त्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकमध्ये पाडळसा-भालोद गण आरक्षित झाल्याने पित्त खवळण्याचा तसेच  जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आह़े संशयित आरोपींमध्ये नारायण चौधरी, प्रकाश जावळे, जीवन इंगळे, विजय चौधरी, नरेंद्र परतले यांचा मुलगा, भूषण चौधरी, चिराग जावळे, वैभव वारके, भरत जावळे, योगेश चौधरी, अक्षय परतणे, चंद्रशेखर झांबरे, सतीश खंबाईत, भरत चौधरी, नीलेश परतणे, चंदन चौधरी, युवराज चौधरी, चिराग जावळे, तुषार झांबरे, सूरज चौधरी, चेतन चौधरी, पंकज चौधरी, हेमंत झांबरे, दिव्यांग सोनवणे, देवेंद्र  इंगळे, संदीप राणे, ललित चौधरी व साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला़
दुस:या गटाचीही तक्रार
दुसरी फिर्याद विजय इंगळे यांनी दिली़ शनिवारी सकाळी सात ते 7.30 वाजेच्या दरम्यान गावातील 20 ते 25 तरुणांनी दुकाने बंद करा, असे सांगत गावातील मुरलीधर जावळे यांचे श्रीजी रेस्टारंट, भालोद दूध उत्पादक सोसायटी, सर्वज्ञ कृषीकेंद्र, मनुदेवी पान सेंटर या दुकानांची तोडफोड करण्यात आली़
जमावाने दहशत निर्माण करण्यासाठी कु:हाडी, पाईपने मारू, अशी धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आह़े चिखली दरवाजा, बसस्टॅण्ड व न्यू इंग्लिश स्कूलजवळ दगडे आडवे लावत तसेच मोटारीचे टायर जाळून दहशत निर्माण केल्याचा आरोप आह़े  त्यावरून 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़
संशयित आरोपींमध्ये राहुल भालेराव, गौरव  भालेराव, सागर भालेराव, वैभव  भालेराव, विपूल भालेराव, कुणाल भालेराव, भारत भालेराव, किशोर ड्रायव्हर, हर्षल भालेराव, सागर भालेराव, शुभम चौधरी, भीमराव भालेराव, मुकेश मनुरे, बंटी भालेराव, शरद भालेराव, सतीश भालेराव, अभय भालेराव, कैलास भालेराव, विद्याधर भालेराव, अशोक भालेराव यांच्यासह 20 ते 25 अनोळखींविरुद्ध भादंवि 143, 147, 427, 341 प्रमाणे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: 47 cases filed against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.