४७ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:14 AM2021-04-19T04:14:58+5:302021-04-19T04:14:58+5:30
जळगाव : कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने जळगाव जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४७ ...
जळगाव : कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने जळगाव जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४७ जणांनी रक्तदान केले.
जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी विभागामार्फत जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील होते. तर, प्रमुख अतिथी म्हणून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन उपस्थित होते. प्रास्ताविक ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केले.
रवींद्र पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक जि.प. गटात रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले, तर गुलाबराव देवकर यांनी जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी विभागाने रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल कौतुक केले. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्हा महिला अध्यक्ष वंदना चौधरी, राज्य सरचिटणीस ओबीसी विभाग डॉ. सुषमा चौधरी, राज्य प्रवक्ते योगेश देसले, वाल्मीक पाटील, लीलाधर तायडे, अशोक लाडवंजारी, दिलीप माहेश्वरी, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, सुनील माळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ओबीसी जिल्हा संघटक भरत चौधरी यांनी केले. रक्तसंकलनासाठी गोदावरी ब्लड बँकेच्या डॉ. प्रियंका कांबळे व कर्मचारी उपस्थित होते. यशस्वितेसाठी ओबीसी महानगराध्यक्ष कौसर काकर, राष्ट्रवादी ओबीसी भुसावळ शहराध्यक्ष नीलेश कोलते, नीलकंठ पाटील आदींनी परिश्रम घेतले.