परराज्यात बस सेवा बंद असल्यामुळे दररोजच ५ ते ७ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:29+5:302021-07-04T04:12:29+5:30

जळगाव : महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गुजरात व मध्यप्रदेश प्रशासनाने मार्च महिन्यापासून महामंडळाच्या बसेसला गुजरात व ...

5 to 7 lakh daily due to closure of bus service in foreign countries | परराज्यात बस सेवा बंद असल्यामुळे दररोजच ५ ते ७ लाखांचा फटका

परराज्यात बस सेवा बंद असल्यामुळे दररोजच ५ ते ७ लाखांचा फटका

Next

जळगाव : महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गुजरात व मध्यप्रदेश प्रशासनाने मार्च महिन्यापासून महामंडळाच्या बसेसला गुजरात व मध्यप्रदेश मध्ये बस आणण्यास निर्बंध घातले आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतरही, गुजरात व मध्यप्रदेश सरकारने हे निर्बंध कायम ठेवल्यामुळे, महामंडळाच्या जळगाव विभागातून गेल्या महिना भरापासून परराज्यातील सेवा बंद आहे. यामुळे दररोज ७ ते ८ लाखांचे उत्पन्न बुडत असल्याची माहिती महामंडळ प्रशासनातर्फे देण्यात आली.

यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने १५ एप्रिल ते ३१ मे पर्यंत कडक लॉकडाऊन केल्यामुळे, महामंडळाची सेवा या कालावधीत पूर्तत: ठप्प होती. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच १० टक्के सेवा सुरू होती. यामुळे महामंडळाचे सुमारे ३० कोटींहून अधिक उत्पन्न बुडाले. मात्र, आता ७ जून पासून महामंडळाची सेवा पुर्ववत सुरू झाली असली तरी, परराज्यातील सेवा मात्र बंदच आहे. त्यामुळे सध्या महामंडळातर्फे राज्यातंर्गतच बससेवा सुरू असून, सध्या या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

दररोज ७ ते ८ लाखांचा फटका

महामंडळाचे जळगाव जिल्ह्यात ११ आगार असून, प्रत्येक आगारातून परराज्यातील सुरत, वापी, सेल्वासा, नवसारी, बडोदा, इंदूर या ठिकाणी मुक्कामी बसेस जात असतात. सर्व आगार मिळून साधारणत : १० ते १५ बसेस या मुक्कामी असतात. थेट प्रवासी मिळत नसले, तरी बसच्या मार्गावर टप्प्या-टप्प्याने प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत. या सेवेतून महामंडळाला चांगले उत्पन्न मिळते. मात्र, कोरोनामुळे संबंधित राज्यांनी बससेवेला परवानगी दिली नसल्यामुळे, जळगाव विभागाचे दररोजचे ७ ते ८ लाखांचे उत्पन्न बुडत आहे.

इन्फो :

महामंडळाच्या जळगाव विभागातील प्रत्येक आगारातून परराज्यात विविध ठिकाणी बसेस जातात. कोरोनामुळे संंबंधित राज्यांनी बससेवेला परवानगी न दिल्यामुळे, ही सेवा सध्या बंद आहे. कोरोनापूर्वी पर राज्यातील सेवेतून १० लाखांपर्यंत उत्पन्न येत होते. आता कोरोना असला तरी ५ ते ७ लाखांपर्यंत सहज उत्पन्न मिळाले असते. मात्र, सेवेला परवानगी नसल्यामुळे, हे उत्पन्न बुडत आहे.

दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ

Web Title: 5 to 7 lakh daily due to closure of bus service in foreign countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.