‘राष्ट्रवादी’ला जळगावात हादरा, ५ नगरसेवक भाजपात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 05:43 AM2018-07-08T05:43:14+5:302018-07-08T05:43:16+5:30
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच विद्यमान नगरसेवकांसह खाविआच्या दोन व मनसेच्या एका नगरसेविकेने शनिवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला
जळगाव - मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्टÑवादी काँग्रेसच्या पाच विद्यमान नगरसेवकांसह खाविआच्या दोन व मनसेच्या एका नगरसेविकेने शनिवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. तसेच माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी देखील भाजपात प्रवेश केला. या प्रवेशामुळे ‘राष्टÑवादी’ला जोरदार हादरा बसला आहे.
गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, विभागीय संघटन मंत्री अॅड. किशोर काळकर, संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, दीपक सुर्यवंशी, श्रीकांत खटोड, श्रीराम खटोड, अतुल हाडा व भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश
भाजपात प्रवेश केलेल्या राष्टÑवादीच्या पाच नगरसेवकांमध्ये राष्टÑवादीचे मनपा गटनेते सुरेश सोनवणे, प्रतिभा कापसे, गायत्री शिंदे, शोभा बारी व मुख्तार बी.पठाण यांचा समावेश आहे. तर खाविआच्या दत्तू कोळी व माजी उपमहापौर भारती सोनवणे तसेच मनसेच्या कांचन सोनवणे यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.