प्लॅस्टिक बंदीमुळे वाढणार जळगाव जिल्ह्यात ५ टक्के कापसाचे क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 09:15 PM2018-06-27T21:15:33+5:302018-06-27T21:17:17+5:30
राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदी केल्यामुळे कापडी पिशव्यांचा वापर वाढणार आहे. यासोबतच कापसाच्या भाववाढीमुळे यंदा जिल्ह्यात कापसाचे ५ टक्क्यांनी क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज जि.प.च्या कृषी विभागाने वर्तविला आहे.
जळगाव : राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदी केल्यामुळे कापडी पिशव्यांचा वापर वाढणार आहे. यासोबतच कापसाच्या भाववाढीमुळे यंदा जिल्ह्यात कापसाचे ५ टक्क्यांनी क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज जि.प.च्या कृषी विभागाने वर्तविला आहे.
जिल्ह्यात यावर्षी कापसाची लागवड कमी होणार असा अंदाज काही दिवसांपूर्वी वर्तविण्यात येत होता़ परंंतु काही दिवसापासून अचानक कापसाचे भाव वाढले असून सहा हजारापेक्षा अधिक भावाने कापूस विक्री होत आहे़ पुढील वर्षी देखील कापसाला चांगला भाव मिळणार असल्याचे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
प्लॅस्टिक बंदीचा होणार लाभ
राज्य शासनाने नुकतीच प्लॅस्टिक बंदी केली. त्यामुळे कापडी पिशव्या किंवा वस्तुंची मागणी वाढणार असल्याचा अंदाज जिप़ कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे़ जिल्ह्यात कापूस हे प्रमुख पीक असून नगदी पीक असल्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडे अधिक कल असतो़ तसेच जिरायत, बागायत व कोरडवाहू अशा तिन्ही स्वरुपात कापसाची लागवड होत असते़ यंदा सुरूवातील पाऊस लांबल्याने कापसाच्या क्षेत्रात घट होणार असल्याचे बोलले जात होते़ मात्र,आठवडाभरात झालेला पाऊस हा कपाशी पिकासाठी पोषक असल्याने अनेक शेतकºयांनी ऐनवेळी कपाशी लागवडीचा निर्णय घेतला आहे़ जिल्ह्यात कापसाच्या लागवडीसाठी २३ लाख २० हजार ७९१ पाकिटे जिप़ कृषी विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात आली होती़ यापैकी १५ हजार पाकिटांची विक्री झाली आहे़