जळगाव शहरात एकाच रात्री पाच घरे फोडली; रोख रक्कम, दागिने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 05:28 PM2017-10-28T17:28:03+5:302017-10-28T17:29:58+5:30
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे घरे बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी महामार्गालगत असलेल्या द्वारका नगरात एकाच रात्री सहा घरांचे कुलूप तोडून रोख रक्कम, सोने व चांदीचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले रवींद्रसिंग संतोष पाटील, रिक्षा चालक विजय पाटील व कढोली, ता.जळगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेले भरत काशिनाथ सूर्यवंशी यांच्या घरातही चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. गेल्या आठवड्यात याच परिसरात सेवानिवृत्त पोलिसांकडे घरफोडी झाली होती.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२९ : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे घरे बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी महामार्गालगत असलेल्या द्वारका नगरात एकाच रात्री सहा घरांचे कुलूप तोडून रोख रक्कम, सोने व चांदीचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले रवींद्रसिंग संतोष पाटील, रिक्षा चालक विजय पाटील व कढोली, ता.जळगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेले भरत काशिनाथ सूर्यवंशी यांच्या घरातही चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. गेल्या आठवड्यात याच परिसरात सेवानिवृत्त पोलिसांकडे घरफोडी झाली होती.
केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले रवींद्रसिंग संतोष पाटील (मुळ रा.कल्याणेहोळ, ता.धरणगाव)यांचे द्वारका नगरात गट क्र.११८ मध्ये प्लॉट क्र.३५ मध्ये माऊली कृपा नावाचे घर आहे. या ठिकाणी पत्नी ज्योती, वडील संतोष नथ्थू पाटील, मुलगा कृष्णा व मुलगी श्रृती असे एकत्र राहतात. पाटील नोकरीच्या ठिकाणी आहे तर दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने पत्नी दोन्ही मुलांसह कोळवद, ता.यावल येथे माहेरी गेल्या होत्या तर वडील कल्याणे होळ येथे गेले होते. त्यामुळे घराला कुलूप होते. चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन मुख्य हॉल, बेडरुम व वरच्या मजल्यावरील एक खोली अशा तिन्ही ठिकाणी सामानाची नासधूस केली आहे. कपाट उघडून त्याची तिजोरी फोडली आहे. किरकोळ दागिने व रोख रक्कम चोरी गेली आहे, मात्र नेमका ऐवज किती चोरी गेला हे ज्योती पाटील यांनाच माहिती आहे. त्या माहेरी असल्याने चोरीबाबत नेमकी आकडेवारी स्पष्ट होऊ शकले नाही.
रवींद्र पाटील यांच्या शेजारीच असलेले विजय झुलाल पाटील (मुळ रा.तरडे, ता.धरणगाव) हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. सिमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले बाळकृष्ण पाटील यांच्या मालकीच्या घरात विजय पाटील हे पत्नी ज्योती व मुलांसह भाड्याने राहतात. दिवाळीनिमित्त कुटुंब गावाला गेले असल्याने हे घरही बंदच होते. घरातील कपाटात ठेवलेले चांदीचे शिक्के व सात हजार रुपये रोख असा १२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. एकाच रांगेत असलेल्या तीन घरांमध्ये चोरट्यांनी धुडगुस घातला आहे. चोरी झाल्याचे कळताच तिन्ही कुटुंबे तातडीने घरी पोहचले.
कुलूप न तुटल्याने चोरटे फिरले माघारी
रवींद्र पाटील यांच्या शेजारी पुर्वेकडे राहणारे वासुदेव गंगाराम पाटील लाडलीकर यांच्या घराचे बाहेरचे कुलूप चोरट्यांनी तोडले, मात्र आतील दुसºया दरवाजाचे कुलूप न तुटल्याने त्यांना तेथून माघारी फिरावे लागले. कुलूप न तुटल्याने पाटील यांच्या घरातील ऐवज सुरक्षित राहिला.
शिक्षकाच्या घरात काहीच मिळाले नाही
गट क्र. ११८ मध्येच प्लॉट क्र.३१ मध्ये भरत काशिनाथ सूर्यवंशी (मुळ रा.आमोदा, ता.जळगाव) हे पत्नी सोनाली, मुलगा हर्षल व पुष्कर यांच्यासह राहतात. दिवाळीनिमित्त ते गावाला गेलेले होते.बंद घराचे कुलूप तोडून दोन्ही मजल्यावरील सामानाची नासधूस केली आहे. कपाट उघडून ड्रॉवर बाहेर काढले आहेत. मात्र सूर्यवंशी यांनी घरात कोणतीही मौल्यवान वस्तू ठेवली नव्हती. सूर्यवंशी हे कढोली, ता.एरंडोल येथे जि.प.च्या शाळेत शिक्षक आहेत