जळगाव जिल्ह्यात ५ लाख शेतकऱ्यांची अद्यापही पीक पेऱ्याची नोंदच नाही; ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत  

By Ajay.patil | Published: September 6, 2023 07:43 PM2023-09-06T19:43:09+5:302023-09-06T19:43:20+5:30

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीकविमा योजना राबवली असून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीकपेरा बंधनकारक आहे.

5 lakh farmers in Jalgaon district still have no records of crop sowing Deadline for e-Peak inspection is 15th September | जळगाव जिल्ह्यात ५ लाख शेतकऱ्यांची अद्यापही पीक पेऱ्याची नोंदच नाही; ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत  

जळगाव जिल्ह्यात ५ लाख शेतकऱ्यांची अद्यापही पीक पेऱ्याची नोंदच नाही; ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत  

googlenewsNext

जळगाव - राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीकविमा योजना राबवली असून नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीकपेरा बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यातील ४ लाख ९३ हजार शेतकऱ्यांनीही अद्यापही पीक पेऱ्याची नोंद केलेली नाही. त्यामुळे जर शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीत पीक पेऱ्याची नोंद केली नाही, तर शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रक्कमेपासून वंचित रहावे लागू शकते.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना आपल्या पीक पेऱ्याची नोंद करून घेण्याचे आवाहन केले आहे. १५ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता येणार आहे. जिल्ह्यात ६ लाख ९६ हजार ६१८ खातेदार शेतकरी आहेत. यापैकी अद्याप २ लाख २ हजार ७१० म्हणजेच ३२.२७ टक्के शेतकऱ्यांनीच पीकपेरा नोंदवलेला आहे. अद्याप ६७.७३ टक्के शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदविला नसल्याने ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

३१ ऑगस्टपर्यंत होती मुदत
शेतकऱ्यांना आपल्या शेतात पीक पाहणी या मोबाईल ऍपद्वारे पीकपेरा नोंदवता येतो. यासाठी शेतकऱ्यांना शेतातील विविध पिकांची आपल्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत होती. मात्र, मागील काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता आली नाही. यामुळे आता या ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे पीक विम्यासाठी असलेली ई-पीक पाहणी शेतकऱ्यांना पूर्ण करता येणार आहे.
 

Web Title: 5 lakh farmers in Jalgaon district still have no records of crop sowing Deadline for e-Peak inspection is 15th September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव