समांतर रस्त्यासाठी 5 लाख मानधन
By admin | Published: January 24, 2017 01:14 AM2017-01-24T01:14:08+5:302017-01-24T01:14:08+5:30
नगरसेवक अनंत जोशी यांचा पुढाकार : महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी महापौरांनीही पुढाकार घ्यावा
जळगाव : शहरातून जाणा:या महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांचा विकास करणे अत्यावश्यक असून या विषयात जबाबदारी झटकण्यापेक्षा तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. मनपाला पक्के समांतर रस्ते करणे शक्य नसले तरीही सपाटीकरण करून व मुरूम टाकून कच्चे समांतर रस्ते बनविणे शक्य आहे. त्यासाठी महापौर, उपमहापौरांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी केले आहे. तसेच या कामासाठी लागणा:या निधीसाठी स्वत:चे 5 वर्षाचे सुमारे 5 लाख रुपयांचे मानधन देण्याचीही तयारी दर्शविली आहे.
शहरातून जाणा:या महामार्गावर दररोज अपघात होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अपघातांना आळा बसावा यासाठी नगरसेवक जोशी यांनी पुढाकार घेतला आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातून जाणा:या महामार्गालगतचा समांतर रस्त्यांचा विकास व्हावा, यासाठी मनसेने स्वाक्षरी अभियान, आंदोलन, उपोषण आदी अनेक मार्गानी पाठपुरावा केला. मात्र मार्ग निघाला नाही.
जळगाव : गेल्या आठ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या दीपेश बळवंत देशमुख (वय 20,रा. इंद्रप्रस्थनगर, जळगाव) या विद्याथ्र्याचा सोमवारी दुपारी 12.45 वाजता उपचार सुरू असताना खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. दिपेश हा 16 रोजी रात्री साडेनऊ वाजता शिरसोली रस्त्यावरील जकात नाक्याजवळ जखमी अवस्थेत आढळून आला होता.
घातपातचा संशय
उपचारांना तो प्रतिसाद देत नव्हता. या घटनेचे वृत्त समजताच जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्या मित्रांची गर्दी झाली.
दीपेश हा आपल्या दुचाकीने (क्र.एम.एच. 19 बीआर 8255) घराबाहेर गेला होता. शिरसोली रस्त्याकडे काहीही संबंध नसताना तो तिकडे गेलाच कसा व अपघाताची स्थिती पाहता हा खरोखर अपघात आहे की घातपात याबाबत मित्र परिवार व अनेकांनी संशय व्यक्त केला. जिल्हा रुग्णालयातही त्याच्या मृत्यूविषयी शंका उपस्थित केली जात होती. घटनेच्या दिवशी दीपेशला जैन उद्योग समूहाच्या
वडिलांचाही अपघातात मृत्यू
दीपेश हा पाच वर्षाचा असतानाच त्याचे वडील बळवंत देशमुख यांचा अपघातात मृत्यू झाला होता. बहीण स्नेहल विवाहित आहे. आई सुरेखा या अनुकंपा तत्त्वावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात लिपिक म्हणून कार्यरत आहे. अतिशय प्रेमळ व मदतीला धावून जाणारा अशी त्याची ओळख होती. आईमध्ये त्याचा प्रचंड जीव असल्याने रोज किमान एकवेळा तो आईसोबतच जेवण करायचा, अशी माहिती मिळाली.