२१ लाख मतदारांची पडताळणी बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:20 PM2020-01-25T12:20:33+5:302020-01-25T12:20:42+5:30
जळगाव : शासनाने मतदार यादी शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्यात जिल्ह्यातील ३४ लाख १२ हजार ६१७ पैकी आतापर्यंत ...
जळगाव : शासनाने मतदार यादी शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्यात जिल्ह्यातील ३४ लाख १२ हजार ६१७ पैकी आतापर्यंत १२ लाख ४८ हजार ७२६ मतदारांची पडताळणी करण्यात आली. अद्यापही २१ लाख ६३ हजार ८९१ मतदारांची पडताळणी बाकी आहे. त्यास केवळ महिनाभराची मुदत उरली आहे.
अनेक मतदारांचा मृत्यू झाल्यानंतर अथवा स्थलांतर झाल्यानंतरही मतदार यादीतून त्यांचे नाव कमी केले जात नाही. त्यामुळे मतदार संख्या फुगलेली दिसते. तसेच अनेक मतदारांची माहिती अपूर्ण असते अथवा छायाचित्र नसते. त्यामुळे निवडणूक विभागाने मतदार यादी शुद्धीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्यात मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ) हे घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करीत आहेत.
मतदार संख्येत होते घट
सध्या मतदार यादी पडताळणीचेच काम सुरू असल्याने दोन ठिकाणी नाव असलेले अथवा मृत्यू झालेल्या मतदारांचे नाव वगळण्यात येत आहे. त्यामुळे मतदार संख्या कमी होत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.
केवळ ३६ टक्के काम पूर्ण
जिल्ह्यात एकूण ३४ लाख १२ हजार ६१७ मतदार आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ १२ लाख ४८ हजार ७२६ मतदारांची म्हणजेच ३६ टक्के मतदारांच्या पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे.