जळगाव येथील पिंप्राळा शिवारातील ५ मोबाईल टॉवर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:45 PM2018-03-09T12:45:08+5:302018-03-09T12:45:08+5:30

५ इमारतीच्या मालकांना शेतसा-याची थकबाकी

5 mobile tower seal | जळगाव येथील पिंप्राळा शिवारातील ५ मोबाईल टॉवर सील

जळगाव येथील पिंप्राळा शिवारातील ५ मोबाईल टॉवर सील

Next
ठळक मुद्दे१ लाख ८२ हजार ५०० रुपये थकबाकीकर भरण्यास टाळाटाळ

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ९ - शेतसाºयाची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाºया पिंप्राळा शिवारातील ५ मोबाईल टॉवरला महसूल प्रशासनाने गुरूवारी सील ठोकले. प्रत्येकाकडे ३६ हजार ५०० रूपये म्हणजेच १ लाख ८२ हजार ५०० रुपये थकबाकी होती.
महसूल विभागाने वसुली वाढविण्यासाठी थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. शहरातील अनेक इमारतींवर मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. मात्र त्याचा कर भरण्यास टाळाटाळ केली जाते.
पिंप्राळा परिसरातील मोबाईल टॉवर असलेल्या ५ इमारतीच्या मालकांना शेतसा-याची थकबाकी असल्याने डिसेंबर महिन्यातच नोटीस बजावण्यात आली होती.
मात्र संबंधीत मालकांनी ती नोटीस मोबाईल टॉवर कंपनीकडे पाठविली होती. मात्र आजपर्यंत कराचा भरणाच करण्यात आलेला नसल्याने गोपाल सोमणी, शालीग्राम बहीरम, रविंद्र साळुंखे, सुलोचना कोठारी, दिनकर राणे यांच्या इमारतीवरील मोबाईल टॉवर सील करण्यात आले. प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या आदेशाने व तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पिंप्राळा मंडळ अधिकारी रविंद्र उगले व तलाठी संदीप डोभाळ यांनी ही कारवाई केली.

Web Title: 5 mobile tower seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.