5 एमपीडीए तर 20 हद्दपारी प्रस्तावित
By admin | Published: February 9, 2017 12:21 AM2017-02-09T00:21:43+5:302017-02-09T00:21:43+5:30
पोलीस महानिरीक्षक : जि.प.निवडणुकीत पोलिसांच्या सुटय़ा रद्द
जळगाव : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील 5 जणांवर एमपीडीए तर 20 जणांवर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित असून अंतिम मंजुरीसाठी हे प्रस्ताव लवकरच महसूल विभागाकडे पाठविले जाणार असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे दिली. हद्दपारीचे आणखी किमान 10 प्रस्ताव वाढू शकतात असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर चौबे बुधवारी शहरात आले होते. पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात त्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिका:यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला व काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या दालनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, नंदकुमार ठाकूर, प्रशिक्षणार्थी आयपीएस मनीष कलवानिया आदी उपस्थित होते.
या निवडणूक काळात पोलीस दलातील कर्मचा:यांच्या सुटय़ा रद्द करण्यात आल्या असून रजेवर गेलेल्या कर्मचा:यांना तातडीने कामावर बोलावण्यात आले असल्याची माहिती चौबे यांनी दिली. दरम्यान, 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात 13 संवेदनशील तर 110 उपद्रवी मतदान केंद्र होती.
यंदा जिल्ह्यात एकही अतिसंवेदशील मतदान केंद्र नाही, परंतु संवेदनशील व उपद्रवी केंद्राची माहिती काढली जात आहे. कलम 107 नुसार 761, 110 नुसार 196 व 149 नुसार 900 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे चौबे यांनी सांगितले.
संवेदशील भागावर लक्ष केंद्रित
जिल्ह्यातील संवेदशील भागावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले असून अशा ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात येणार आहे. परिक्षेत्रात 16 फेब्रुवारी रोजी जळगाव व अहमदनगर येथे मतदान होणार आहे, त्यामुळे बंदोबस्ताचे त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे.
निवडणूक काळात गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांची गस्त आतापासूनच वाढविण्यात आल्याचे चौबे म्हणाले.ं